पुणे : महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पुतणे आणि समाजसेवक तुकाराम शिंदे यांचे नातू प्रणय शिंदे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रणय शिंदे यांचे पक्षात स्वागत करुन, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Nephew of Arvind Shinde, Pranay Shinde joined BJP
यावेळी महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे मनपा गटनेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, युवा मोर्चा सरचिटणीस अभिजीत राऊत आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, एखाद दुसऱ्या पक्षांतरामुळे भाजपाचे काहीही नुकसान होत नाही. उलट आगामी काळात शहरातील अनेक दिग्गज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत होण्यास अजून मदतच होणार आहे.
दरम्यान, प्रणय शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना भाजपा युवा मोर्चा पुणे शहरच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्याची घोषणा युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर यांनी केली.
Nephew of Arvind Shinde, Pranay Shinde joined BJP
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेचा माझी हत्या करण्याचा हेतू होता; किरीट सोमय्यांनी शेअर केला व्हिडीओ
- लतादीदींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक शिवतीर्थावर व्हावे; नाना पटोलेंचा राम कदमांच्या भूमिकेला पाठिंबा!!
- लता मंगेशकर अंत्यसंस्काराला काँग्रेस नेत्यांची अनुपस्थिती, स्पष्टीकरण देता देता नाना पटोले यांनी दमछाक
- वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात शिवप्रतिष्ठानची जनजागृती रॅली