• Download App
    लस हवी, सिरींज घेऊन या;शिरूरमध्ये अजब प्रकार; नागरिक लसीकरण केंद्रात चक्रावले। Need vaccine, bring a syringe; Strange thing in Shirur

    लस हवी, सिरींज घेऊन या; शिरूरमध्ये अजब प्रकार; नागरिक लसीकरण केंद्रात चक्रावले

    विशेष प्रतिनिधी

    शिरूर : शिरूर शहरात ग्रामीण रुग्णालयामध्ये लसीकरणासाठी लागणारे सिरिंज नागरिकाना बाहेरून ( मेडिकलमधून ) बेकायदेशीर पैसे देऊन आणावी लागत आहे, मगच लस देण्यात येत आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय व नागरिकांची आर्थिक व मानसिक लुट करणार आहे.
    Need vaccine, bring a syringe; Strange thing in Shirur

    अशा नियमबाह्य गलथान कारभाराला आळा बसावा,नागरिकांची आर्थिक-मानसिक लूट थांबावी, व सिरिंज (इंजेक्शन) हे रुग्णालयामध्ये मोफतच मिळावे, यासाठी गांधीगिरी मार्गाने निषेध नोंदवत सिरिंज बॉक्स मनसेच्यावतीने रुग्णालयाला भेट देण्यात आला..



    गेल्या २ महिन्यांपासून नागरिक बाहेरून सिरिंज घेऊन यावी लागत आहे. यात मेडिकल व ग्रामीणचे अधिकारी-कर्मचारी यांचा काही आर्थिक व्यवहार चालू आहे का..? याची चौकशी व्हावी, आजपर्यंत देण्यात आलेले लसीकरण यांचे ऑडिट व्हावे, तसेच लस घेतल्यानंतर देण्यात येणाऱ्या गोळ्या कुठे गेल्या याचा शोध घेण्यात यावा व सदर कार्यालयाची दप्तरी चौकशी व्हावी. तसेच होणारे लसीकरण नागरिकांची अडवणूक न करता, मोफतच देण्यात यावे अशा नागरिकांशी निगडित असणाऱ्या सर्व प्रश्नावर मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ॲड. स्वप्नील माळवे यांनी आवाज उठवला व पुढील लसीकरण काळात जर नागरिकांना सिरीन आणण्यास सांगितल्यास मनसे स्टाईलने निषेध नोंदवू असा इशारा देण्यात आला.

     

    •  कोरोनाविरोधी लस हवी, सिरींज घेऊन या
    • शिरूर ग्रामीण रुग्णालयात अजब प्रकार
    •  गेल्या २ महिन्यांपासूनचे चित्र
    • मनसे आक्रमक, चौकशीची मागणी

    Need vaccine, bring a syringe; Strange thing in Shirur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून राष्ट्रवादीने दाखविले खायचे दात; भारतात कुराण लागू करायची सना मलिकांची मागणी; राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा!!

    Anna Hazare : माहिती अधिकाराची धार बोथट केल्यास प्राणाची आहुती देईन; नियम बदलल्याने अण्णा हजारे आक्रमक, 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा

    Arup Roy : बंडखोरांचे ममता बॅनर्जींना सर्वात मोठे आव्हान; टीएमसीची समांतर कार्यसमिती स्थापन केली, अरूप रॉय अध्यक्ष