विशेष प्रतिनिधी
शिरूर : शिरूर शहरात ग्रामीण रुग्णालयामध्ये लसीकरणासाठी लागणारे सिरिंज नागरिकाना बाहेरून ( मेडिकलमधून ) बेकायदेशीर पैसे देऊन आणावी लागत आहे, मगच लस देण्यात येत आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय व नागरिकांची आर्थिक व मानसिक लुट करणार आहे.
Need vaccine, bring a syringe; Strange thing in Shirur
अशा नियमबाह्य गलथान कारभाराला आळा बसावा,नागरिकांची आर्थिक-मानसिक लूट थांबावी, व सिरिंज (इंजेक्शन) हे रुग्णालयामध्ये मोफतच मिळावे, यासाठी गांधीगिरी मार्गाने निषेध नोंदवत सिरिंज बॉक्स मनसेच्यावतीने रुग्णालयाला भेट देण्यात आला..
गेल्या २ महिन्यांपासून नागरिक बाहेरून सिरिंज घेऊन यावी लागत आहे. यात मेडिकल व ग्रामीणचे अधिकारी-कर्मचारी यांचा काही आर्थिक व्यवहार चालू आहे का..? याची चौकशी व्हावी, आजपर्यंत देण्यात आलेले लसीकरण यांचे ऑडिट व्हावे, तसेच लस घेतल्यानंतर देण्यात येणाऱ्या गोळ्या कुठे गेल्या याचा शोध घेण्यात यावा व सदर कार्यालयाची दप्तरी चौकशी व्हावी. तसेच होणारे लसीकरण नागरिकांची अडवणूक न करता, मोफतच देण्यात यावे अशा नागरिकांशी निगडित असणाऱ्या सर्व प्रश्नावर मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ॲड. स्वप्नील माळवे यांनी आवाज उठवला व पुढील लसीकरण काळात जर नागरिकांना सिरीन आणण्यास सांगितल्यास मनसे स्टाईलने निषेध नोंदवू असा इशारा देण्यात आला.
- कोरोनाविरोधी लस हवी, सिरींज घेऊन या
- शिरूर ग्रामीण रुग्णालयात अजब प्रकार
- गेल्या २ महिन्यांपासूनचे चित्र
- मनसे आक्रमक, चौकशीची मागणी
Need vaccine, bring a syringe; Strange thing in Shirur
महत्त्वाच्या बातम्या
- Narendra Modi in Varanasi : काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण; पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर
- CONGRATULATIONS INDIA : २१ वर्षांनंतर भारताला ‘Miss Universe’चा किताब ! हरनाज कौर संधूनं पटकावलं विजेतेपद
- Omicron Case In Nagpur : नागपूरमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण महाराष्ट्रात १८ रुग्ण
- Republic Day : प्रजासत्ताक दिनी पाच मध्य आशियातील देशांचे नेते भारताचे पाहुणे …
- सामूहिक विनाशाचे हत्याकर म्हणून अमेरिकेकडून लोकशाहीचा वापर, चीनची सडकून टीका