• Download App
    NCW महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय महिला आयोगाचा मुंबईत दोन दिवस शक्ती संवाद; सर्व राज्यांच्या महिला आयोगांचा सहभाग; मुख्यमंत्री फडणवीस करणार उद्घाटन

    NCW : महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय महिला आयोगाचा मुंबईत दोन दिवस शक्ती संवाद; सर्व राज्यांच्या महिला आयोगांचा सहभाग; मुख्यमंत्री फडणवीस करणार उद्घाटन

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षण या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाने पुढाकार घेतला असून राष्ट्रीय महिला आयोगाचा महिला सक्षमीकरणासाठी मुंबईत दोन दिवस शक्ती संवाद आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतल्या हॉटेल ट्रायडेंट मध्ये या शक्ती संवादाचे उद्घाटन होणार आहे. या शक्ती संवादाची सविस्तर माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

    राष्ट्रीय महिला आयोगाने महिला सक्षमीकरणासाठी देशव्यापी मोहीम हाती घेतली असून विविध राज्यांमध्ये जाऊन महिलांसाठी तसेच संपूर्ण समाजाच्या जागृतीसाठी शक्ती संवादाचे आयोजन करत आहे. याद्वारे महिला सक्षमीकरण, प्रशिक्षण तसेच देशात महिलांच्या सुरक्षा, सक्षमीकरणाविषयी असलेल्या कायद्यांची माहिती देणे, प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन देणे, या संदर्भात व्यापक जनजागृती करणे, असे कार्यक्रम आयोजित करीत आहे. याच साखळीतील पुढचा कार्यक्रम 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट 2025 या दोन दिवशी मुंबईतल्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये आयोजित केला असून या शक्ती संवाद उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे उपस्थित राहतील. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर त्याचबरोबर अन्य राज्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अन्य पदाधिकारी या शक्ती संवादामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहेत.

    कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ आणि कायदेशीर प्रतिबंधात्मक उपाय योजना या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाने तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल.

    या आधीचा शक्ती संवाद एप्रिल 2025 मध्ये अयोध्येत झाला
    होता. त्यानंतर हा शक्ती संवादाचा दुसरा उपक्रम मुंबईमध्ये होतो आहे. यापुढेही अन्य राज्यांमध्ये शक्ती संवादाचे कार्यक्रम होणार आहेत.



    शक्ती संवादाची रूपरेषा

    • राष्ट्रीय महिला आयोगाने शक्ती संवाद कार्यक्रमाची दोन दिवसांची सविस्तर रूपरेषा निश्चित केली असून पहिल्या दिवशीच्या परिसंवादांमध्ये देशातल्या महिला आयोगांसमोर असलेली आव्हाने आणि संधी, त्याचबरोबर मानवी तस्करी विरोधातील कायदे आणि अंमलबजावणी, विविध संस्थांमधील समन्वय यांचा समावेश असेल.
    • त्याचबरोबर पहिल्या दिवशी बीजिंग जाहीरनाम्यानुसार देशात महिला कायद्यांची अंमलबजावणी आणि त्यापुढील आव्हाने आणि संधी या विषयावर देखील परिसंवाद होणार आहे.
    • दुसऱ्या दिवशीच्या शक्ती संवादात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर क्राईम सिक्युरिटी या अंतर्गत महिलांना येणाऱ्या समस्या त्याचबरोबर त्या सोडवण्यासाठी निर्माण झालेल्या संधी यावर परिसंवाद होणार आहे.
    • राज्यघटना निर्मितीत महिलांचे योगदान मोठे राहिले आहे पण तो विषय आत्तापर्यंत फारसा जनमानसासमोर आला नव्हता. या पार्श्वभूमीवर भारतीय महिला आयोगाने पुढाकार घेऊन राज्यघटनेच्या निर्मितीत महिलांचे योगदान या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित केला असून घटना समितीच्या 15 महिला सदस्यांच्या योगदानाची या परिसंवादात विशेष चर्चा होणार आहे.
    • “केअर मॅटर्स” या थीम वर आधारित एक परिसंवाद होणार असून त्यामध्ये अनपेड केअर वर्क्स या विषयाकडे लक्ष वेधण्यात येईल. महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी जनजागृती, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता आणि काळजी त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी लिंग समानता, या विषयावर भर देणाऱ्या परिसंवादाचाही शक्ती संवादात समावेश केला आहे.
    • भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यांच्या अंतर्गत महिला विषयक कायदेशीर चौकटीचा विस्तार आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी यावर देशातल्या सर्व महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि प्रतिनिधी यांचे विशेष सत्र होणार आहे. यामध्ये महिलांची सुरक्षितता त्यांचे अधिकार, त्यांची सामाजिक, आर्थिक जबाबदारी आणि समाजाचे महिलांप्रती असलेले दायित्व यावर भर देण्यात येईल.
    • राष्ट्रीय महिला आयोगाने देशातल्या विविध क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या महनीय व्यक्तींची एक सल्लागार समिती नेमली आहे. महिला विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी प्रभावी सूचना करण्याचे काम ही समिती करते. या समितीचे सदस्य देखील शक्ती संवादामध्ये सहभागी होऊन आपले मोलाचे योगदान देणार आहेत.

    NCW organises Capacity Building Program for State Women Commissions from across the Country; CM to inaugurate

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Akshay Kumar : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना पुणे न्यायालयाचा दणका; नेमकं काय आहे प्रकरण?

    Raj Thackeray बेस्ट साेसायटी निवडणुकीत दारुण पराभवानंतर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, उत्तर देताना संजय राऊतांच्या नाकीनऊ

    Devendra Fadnavis : ठाकरेंनी राजकीयकरण केल्याने जनतेने नाकारले; बेस्ट निवडणूक निकालावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया