• Download App
    राष्ट्रवादीकडून सरकार कोसळण्याच्या तारखा - मुहूर्त आणि शिंदे - फडणवीसांची बॉडी लँग्वेज NCP's threat and Shinde Fadanavis confident body language

    राष्ट्रवादीकडून सरकार कोसळण्याच्या तारखा – मुहूर्त आणि शिंदे – फडणवीसांची बॉडी लँग्वेज

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर साईबाबांच्या शिर्डीत सुरू आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कँडी हॉस्पिटल मधून थेट चिंतन शिबीर स्थळी शिर्डीत येणार आहेत आणि तेथून ते पुन्हा ब्रीच कँडीत ऍडमिट होणार आहेत. शरद पवार 3 नोव्हेंबरला म्हणजे परवाच शिर्डीत येणार होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आधीच ब्रीच कॅंडीत दाखल झाले होते. त्यातच त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. आता ते बरे आहेत. त्यामुळेच ते शिर्डीत चिंतन शिबीर स्थळी येणार आहेत. NCP’s threat and Shinde Fadanavis confident body language

    पण या चिंतन शिबिराच्या आधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकार शिंदे – फडणवीस सरकार कोसळण्याचा मुहूर्त जाहीर करून टाकला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी चिंतन शिबीर झाले की शिंदे – फडणवीस सरकार कोसळेल, असे ते म्हणाले होते. यासाठी त्यांनी काँग्रेसच्या चिंतन शिबिराचा हवाला दिला होता. शिर्डीचा पायगुण असा आहे की इथे कोणत्याही पक्षाचे चिंतन शिबीर झाले की महाराष्ट्रातले सरकार कोसळते, असा टोला त्यांनी खासदार सुजय विखे पाटलांना लगावला होता. एकूण जयंत पाटलांनी महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याचा राजकीय मुहूर्त निश्चित केला होता. त्याला राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांनी दुजोराही दिला.


    झिरवाळांचा उल्लेख आदिवासी : जयंत पाटलांच्या डोक्यात जातीवाद; गोपीचंद पडळकरांचे शरसंधान


    दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचेच 12 नेते फुटून भाजपमध्ये जातील, असे वक्तव्य “काय झाडी, काय हाटेल सगळं ओक्के” फेम आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले होते. त्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकापाठोपाठ एक उत्तरे दिली. यात अमोल मिटकरी यांनी देखील भर घातली. मॅजिक फिगर महाविकास आघाडीकडेच असेल, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी अजित पवारांनी राज्याचे नेतृत्व करावे म्हणजे मुख्यमंत्री व्हावे असे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगून स्वतःसाठी राजकीय एस्केप रूट देखील शोधून ठेवला.

    • घटना तज्ञांचे “अधिष्ठान”

    पण जयंत पाटील असोत, राष्ट्रवादीचे बाकीचे नेते असोत किंवा अमोल मिटकरी असोत, त्यांच्या विधानामागे उल्हास बापटांसारख्या घटना तज्ञाचे “अधिष्ठान” आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वक्तव्यांच्या आधी शिंदे – फडणवीस सरकार कोसळून महाविकास आघाडी सरकार येऊ शकते, असा नॅरेटिव्ह घटना तज्ञ उल्हास बापटांनी सेट केला होता. तो मराठी नॅरेटिव्ह मराठी माध्यमांनी जोरदार चालवला होता.

    पण हे सगळे सुरू असताना दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?? यांचे राजकीय आणि सरकारी कार्यक्रम काय सांगतात?? या सर्व घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते नेमके कुठे कुठल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते??, याचा नीट आढावा घेतला तर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा नेमका अंदाज येऊ शकेल.

    • घटना तज्ञ आणि शिंदे फडणवीस यांचे कार्यक्रम

    ज्यावेळी उल्हास बापट शिंदे – फडणवीस सरकार कोसळून महाविकास आघाडी सरकार येईल, असे सांगत होते, त्याच्याच आसपास शिंदे फडणवीस महाराष्ट्रातल्या 75 हजार जणांना नोकरी रोजगार देण्याच्या कार्यक्रमात सामील झाले होते. या महत्त्वाकांशी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ऑनलाइन सहभागी झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इंडिया टुडे कन्क्लेव्ह मध्ये सहभागी झाले. तिथे त्यांनी सरकारच्या 100 दिवसातला कामगिरीचा पाढा वाचला. मुंबई ते सुरत, सुरत ते गुवाहाटी गुवाहाटी ते गोवा आणि गोवा ते मुंबई हा प्रवास कसा झाला, मंत्रीपदावरून मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास कसा झाला, याचे सर्व वर्णन केले. पत्रकार साहिल जोशी यांच्या उभ्या – आडव्या – सरळ – तिरक्या सर्व प्रश्नांना आपल्या शैलीत “सरळ” उत्तरे दिली. त्यांच्या बॉडी लँग्वेज मध्ये आपल्या सरकारला धोका असल्याचे कुठेही दिसले नाही.

    • फडणवीसांचा पंढरपूर दौरा

    दुसरीकडे देवेंद्र फडणवीस कार्तिकी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या पूजेसाठी पंढरपूर दौऱ्यावर आले. पांडुरंगाची यथासांग पूजा केली. संत नामदेव मंदिराला भेट दिली. एका मार्गाचे भूमिपूजन केले. इतकेच नाही, तर बार्शी दौऱ्यात भगवंताचे दर्शन घेतले. याच्या आधी सोलापूर जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांना भेटून गेल्याच्या बातम्या आल्या. दरम्यानच्या काळात संभाजी भिडे कुंकू एपिसोड घडून गेला. पण फडणवीसांच्या दौऱ्यामध्ये त्यांच्या पत्रकारांना दिलेल्या बाईट मध्ये कोठेही सरकार डळमळीत असल्याची भीती दिसून आली नाही. फडणवीसांची बॉडी लँग्वेज देखील नेहमीप्रमाणे आत्मविश्वासाने भरलेली दिसली.

    • फडणवीसांनी कधी तारीख दिली नव्हती

    आधीच्या अडीच वर्षांमध्ये चंद्रकांतदादा पाटील नेहमी आघाडी सरकार कोसळण्याच्या तारखा द्यायचे. बाकीचे भाजपचे काही नेते त्या तारखा इकडे तिकडे थोड्या फिरवायचे. पण फडणवीस यांनी कधी आघाडी सरकार कोसळण्याची तारीख दिली नव्हती. पण वारंवार प्रश्न विचारल्यानंतर आणि त्या वेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार पाडूनच दाखवा, असे आव्हान दिल्यानंतर एकच उत्तर दिले होते. फडणवीस म्हणाले होते, सरकार कधी पडेल याची तारीख मी देणार नाही. पण सरकार जेव्हा पडेल, त्यावेळेला तुम्हाला कळणारही नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला होता. याची मात्र जयंत पाटील यांनी सरकार कोसळण्याच्या दिलेल्या राजकीय मुहूर्तावर आठवण झाली इतकेच!!

    NCP’s threat and Shinde Fadanavis confident body language

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!