• Download App
    विधवांसाठी 'गंगा भागीरथी' असा शब्द वापरण्यावरून राष्ट्रवादीच्याच सुप्रिया सुळे व रूपाली चाकणकर आमनेसामने...NCPs Supriya Sule and Rupali Chakankar face to face over using the word Ganga Bhagirathi for widows

    विधवांसाठी ‘गंगा भागीरथी’ असा शब्द वापरण्यावरून राष्ट्रवादीच्याच सुप्रिया सुळे व रूपाली चाकणकर आमनेसामने…

    महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रधान सचिवांना पाठवलेल्या पत्राचा आहे प्रमुख मुद्दा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : विधवा महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळावून देण्यासाठी राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधवा महिलांसाठी ‘गंगा भागीरथी’ असा शब्दप्रयोग वापरात आणण्याच्यादृष्टीने प्रधान सचिवांना पत्र लिहिले आहे. विशेष म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. यामुळे आता निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन महिला नेत्या आमनेसामने आल्याचे दिसत आहे. NCPs Supriya Sule and Rupali Chakankar face to face over using the word Ganga Bhagirathi for widows

    ‘’महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्याकरिता विधवा ऐवजी ‘गंगा भागिरथी’ (गं.भा) हा शब्द वापरण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्याबद्दल त्यांचे मनपुर्वक आभार.’’ असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

    याचबरोबर, ‘’पतीचे निधन झाल्यानंतर महिलेला विधवा न संबोधता सन्मानजनक पर्यायी शब्द वापरावा अशी शिफारस सर्वप्रथम राज्य महिला आयोगाने केली होती. पतीचे निधन झाल्यानंतर महिलेला विधवा संबोधण्यात येते. हा शब्द महिलांचा अपमान करणारा,  त्यांचे मनोबल खच्ची करणारा असल्याची भावना जनमानसात आहे. असे सांगत विधवा शब्दाला पर्याय म्हणून ‘पुर्णांगी‘ शब्द वापरावा अशी आयोगाने शिफारस शासनाकडे केली होती. राज्य महिला आयोगाची अध्यक्षा या नात्याने जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात या शिफारसीबाबत घोषणा केल्यानंतर उपस्थित शेकडो महिलांनी हात उंचावत याला पाठिंबा दिला होता. आयोगाच्या या शिफारसीचा संवेदशीलतेने विचार करत महिलांना सन्मान मिळवून देणारा सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मंत्री महोदयांचे अभिनंदन…पुरोगामी महाराष्ट्राचा हा निर्णय महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण यात मोलाचा ठरेल अशी आशा आहे.’’ असंही चाकणकर यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

    दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र मंगलप्रभात लोढांच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदवत म्हटले की, ‘’महाराष्ट्राचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दि.१२ एप्रिल २०२३ रोजी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिलेले व समाजमाध्यमांवर तसेच माध्यमांमध्ये व्हायरल झालेले पत्र वाचले. याबाबत निर्णय घेण्याचा आपण जो विचार करत आहात तो मागे घ्यावा, ही आमची आग्रहाची मागणी आहे.’’

    याशिवाय, ‘’पती गमाविलेल्या महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये प्रयत्न सुरू असताना, शासन हा जो काही वेगळा विचार करीत आहे, हा घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो. महिलांच्या बाबतीतील हा अतिशय संवेदनशील विषय हाताळत असताना व त्यासंबंधी मोठा निर्णय घेत असताना त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था व संघटनांना विश्वासात घेऊन व त्यांच्यासोबत विचार विनिमय करून मंगलप्रभात लोढा आपण निर्णय घेतला पाहिजे.’’ असं सुप्रिया सुळे यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

    NCPs Supriya Sule and Rupali Chakankar face to face over using the word Ganga Bhagirathi for widows

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    म्हणे, शिंदे + अजितदादा कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; पण यात संजय राऊतांनी कोणता मोठ्ठा “जावईशोध” लावला??

    काकांनी सल्ला ऐकला नाही, आता अजितदादांचा के. पी. पाटलांना सल्ला; 84 चे होणार आहात, आता रिटायरमेंट घ्या!!

    Devendra Fadnavis : WAVES 2025 परिषदेमध्ये 8000 कोटींचे सामंजस्य करार; तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टीम!!

    Icon News Hub