आमदारांची मुले, खासदार सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे हे दारू पिऊन रस्त्यावर पडतात असे वक्तव्य करणारे वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांच्याविराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ऍड .रुपाली पाटील यांनी राजकीय महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याविरुद्ध पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला दाखल केलेला आहे.NCP’s Rupali Patil files complaint against Bandatatya Karadkar
विशेष प्रतिनिधी
पुणे : आमदारांची मुले, खासदार सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे हे दारू पिऊन रस्त्यावर पडतात असे वक्तव्य करणारे वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांच्याविराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ऍड . रुपाली पाटील यांनी राजकीय महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याविरुद्ध पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला दाखल केलेला आहे.
न्यायालयाने या प्रकाराची दखल घेऊन आरोपींना कडक शासन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रुपाली पाटील यांच्यातर्फे ऍड विजयसिंह ठोंबरे, ऍड हितेश सोनार, ॲड दिग्विजयसिंह ठोंबरे व विष्णू होगे काम पाहत आहेत. बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रिया सुळे, पंकजा मुंढे यांच्याबाबत मद्यपानाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याविरुद्ध कायदेशीर लढा या वक्तव्याविरोधात राजकीय पडसाद उमटले आहेत. महिला आयोगानेही पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत.
आमदारांची पोरं, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात, असे वक्तव्य ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केले होते. मात्र, त्यांनी या वक्तव्यावर कालच माफी मागितली हाेती. ज्यांच्याबद्दल मी वक्तव्य केले आहे त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागायला तयार आहे. ज्यांच्याविषयी मी बोललो त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क केला आहे. त्यामुळे जर माझे वक्तव्य चुकले असेल तर मी माफी मागतो. त्यात कमीपणा कसला, अस कराडकर म्हणाले हाेते.
NCP’s Rupali Patil files complaint against Bandatatya Karadkar
महत्त्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक; सुप्रिया सुळे – पंकजा मुंडे यांच्या नावांचे उल्लेख भोवले!!
- बैलगाडी शर्यतीत बैल उधळले, रायगड जिल्ह्यातील नांदगाव येथील अपघातात तीन जण जखमी
- सांगलीच्या रणरागिणीकडून महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखर सर