• Download App
    NCP@25 : Sanjay raut targets pawar over reshuffle in NCP

    राष्ट्रवादी @25 : आधीची भाकरी करपली म्हणून नवी थापली, पवार बलदंड, पण पक्ष आटोपशीर; सामनातून टिचक्या – टपल्या!!

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाच्या वयाच्या पंचविशीत अध्यक्ष शरद पवारांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष नेमून भाकरी फिरवली. त्या मुद्द्यावर भाजपने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी याला भाकरी फिरवणे म्हणत नाहीत, फारतर याला धुळफेक म्हणता येईल, असे शरसंधान साधले. सामनाच्या अग्रलेखातून साधारणपणे अशीच भाषा वापरून संजय राऊत यांनी पवारांना टिचक्या – टपल्या हाणल्या. इतकेच नाही, तर पवार बलदंड पक्ष पण पक्ष आटोपशीर, असे म्हणत या आटोपशीर पक्षाला दोन कार्यकारी अध्यक्ष नेमायची काय गरज पडली??, असा खोचक सवालही केला. NCP@25 : Sanjay raut targets pawar over reshuffle in NCP

    सामनाच्या अग्रलेखात राऊत म्हणतात :

    • केरळ, नागालँड सारख्या राज्यांमधून काही आमदार निवडून आले असतील, पण पक्षाचा सगळा कारभार महाराष्ट्र पुरताच मर्यादित आहे. पवारांचा पक्ष आटोपशीर आहे, पण पवार बलदंड नेते आहेत. त्यांच्या शब्दाला देशाच्या राजकारणात मान आहे.
    • या आटोपशीर पक्षाला दोन दोन कार्यकारी अध्यक्ष नेमायची काय गरज पडली?? पवारांच्या राष्ट्रवादी पेक्षा देशात अनेक मोठे पक्ष आहेत. त्यांनी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची उदाहरणे नाहीत. घराणेशाहीचा आरोप होऊ नये म्हणून कदाचित पवारांनी प्रफुल्ल पटेल या गुजरात्याला कार्यकारी अध्यक्ष नेमला असेल. कारण पटेल यांचा वावर दिल्लीत असतो.
    • प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्याबरोबरच जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे योगानंद शास्त्री मोहम्मद फैसल यांच्याकडे सरचिटणीस म्हणून जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्या कागदावरच राहतील. सुनील तटकरे यांच्याकडे अल्पसंख्यांक विभाग, शेतकरी प्रश्न, बंगाल, ओडिशा या राज्यांची जबाबदारी दिली आहे. पण हे सर्व राष्ट्रीय पातळीवर करण्याची तटकरे यांची मानसिकता आहे का??
    • महत्त्वाचे म्हणजे सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी आली आहे. याचा अर्थ तिकीट वाटपापासून पक्ष पदाधिकारी नेमण्यापर्यंत त्यांच्यावर जबाबदारी आहे आणि त्यात अजित पवार, जयंत पाटील यांचाही वाटा आहे. सुप्रिया सुळे यांना आता खऱ्या अर्थाने या कसोटीवर उतरावे लागेल.
    • मराठी माध्यमांनी या सगळ्या राजकारणाला भाकरी फिरवणे असे म्हटले आहे. पण पवारांनी भाकरी फिरवली नसून आत्ता कुठे चुलीवर टाकली आहे. भाकरी कच्ची राहू नये म्हणून ती फिरवावीच लागते. आधीची भाकरी करपल्याने नवी भाकरी थापली असेल, तर वाट पाहावी लागेल.

    अशा शब्दांनी संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नवनियुक्त नेत्यांना टिचक्या आणि टपल्या हाणल्या आहेत.

    NCP@25 : Sanjay raut targets pawar over reshuffle in NCP

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!