राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या पंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त सरप्राईज एलिमेंट देत पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात वाटून दिली. त्याचे तपशील शरद पवारांनी नंतरच्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. हे तपशील वाचल्याबरोबर पहिली प्रतिक्रिया म्हणून राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या याद्या सहज आठवल्या!! NCP@25 : executive presidents, will they be able to work or it will like non performing star campaigners??
शरद पवारांनी मूळात राष्ट्रवादीने दोन कार्यकारी अध्यक्ष का नेमले??, याचा खुलासा करताना त्याची कारणे सांगितली. एक तर देशाची व्याप्ती बघता कोणाही एका व्यक्तीला संपूर्ण देश कव्हर करणे शक्य नाही. त्यातही निवडणुका जवळ आल्याने ते आणखी अवघड आहे. त्यामुळे 2 व्यक्तींकडे कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन त्यांच्यात प्रत्येकी 3 – 4 राज्ये वाटून दिली आहेत आणि त्या जबाबदार नेत्यांनी महिन्यातले किमान 4 दिवस दिल्ली आणि ज्या राज्यांची जबाबदारी आहे, तिथे प्रत्यक्ष जाऊन संघटना वाढवायचे प्रयत्न केले पाहिजेत, अशी चर्चा पक्षात झाली आहे आणि मला आनंद आहे की ही जबाबदारी काही सहकार्यांनी स्वीकारली आहे, असे पवार म्हणाले. त्याचवेळी त्यांनी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद रिकामे नसल्याने सुप्रिया सुळे की प्रफुल्ल पटेल यापैकी कोण अध्यक्ष होईल?, ते नंतर बघता येईल असे स्पष्ट केले आहे.
अर्थातच पवारांचे हे वक्तव्य वाचल्यानंतर राष्ट्रवादीने गेल्या काही वर्षांमध्ये जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या याद्या सहज आठवल्या. फार जुन्या इतिहासात शिरायची गरज नाही. पण 2017 पासून ज्या 5 – 7 राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका झाल्या, त्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात ते अगदी कर्नाटक या राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने वेळोवेळी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये 20 ते 40 एवढ्या नेत्यांची नावे होती. अनेकदा स्टार प्रचारकांची यादी आली की त्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये यायच्या आणि त्या स्टार प्रचारकांच्या यादीतून अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना वगळल्याचे नमूद केले जायचे. पण त्यापलीकडे या स्टार प्रचारकांच्या बातम्यांकडे माध्यमांचे फारसे लक्ष नसायचे. राष्ट्रवादीने नेमलेले 20 ते 40 स्टार प्रचारक नेमके त्या – त्या राज्यांमध्ये केव्हा जातात??, तिथे कुठे दौरा करतात??, कोणत्या मतदारसंघांमध्ये त्यांची भाषणे आणि दौरे झाले?? याचा थांगपत्ता कोणाला लागायचा नाही.
स्टार प्रचारक – उमेदवारांची संख्या व्यस्त
इतकेच नाही, तर राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची संख्या 20 ते 40 च्या दरम्यान असायची. पण प्रत्यक्ष त्या राज्यांमध्ये उमेदवारांची संख्या डबल डिजिटमध्ये तरी असायची का??, याविषयी देखील कोणत्या माध्यमांनी शंका उपस्थित केल्याच्या बातम्या आलेल्या नाहीत. म्हणजे स्टार प्रचारकांची संख्या डबल डिजिटमध्ये आणि उमेदवारांची संख्या सिंगल डिजिट मध्ये असे राष्ट्रवादीच्या बाबतीत अनेकदा घडले आहे.
आता जेव्हा खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांना प्रत्येकी 3 – 4 राज्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत आणि त्यांच्याकडून महिन्यातले किमान 4 दिवस त्या – त्या राज्यांमध्ये जाऊन संघटनात्मक बांधणी करण्याचे अपेक्षा ठेवली आहे, तेव्हा ते प्रत्यक्ष तिथे जाऊन नेमके काय करणार??, या विषयी फार मोठी शंका आहे!!
तसेही लोकसभा निवडणूक नियोजित वेळेनुसार झाली तर आता केवळ 11 महिने बाकी आहेत आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तशीच झाली तर साधारण 16 महिने बाकी आहेत. एवढ्या कमी कालावधीत दर महिन्यातले 4 दिवस आपापल्या जबाबदारी असलेल्या राज्यांना द्यायचे म्हटल्यानंतर साधारणपणे दीड ते दोन महिने एवढाच कालावधी संबंधित नेते प्रत्येक राज्याला देऊ शकतील, अशी स्थिती आहे. याचा अर्थ एवढ्या कमी कालावधीत कार्यकारी अध्यक्ष नेमके त्यांच्या जबाबदारीच्या राज्यांमध्ये नेमकी संघटनात्मक बांधणी कशी करणार आणि त्याचा परिणाम तरी कितपत होणार होणार??, की केवळ काँग्रेस आणि तिथल्या स्थानिक प्रादेशिक पक्षांना आपले उपद्रव मूल्य दाखवून देण्याचा प्रकार करणार??, हे यक्ष प्रश्नच आहेत!!
खरी राजकीय मेख
यातली खरी “राजकीय मेख” सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देणे आणि त्याच बरोबरीने श्रीमंत शेतकऱ्यांची राज्ये असलेल्या पंजाब आणि हरियाणाची जबाबदारी देणे ही आहे. “श्रीमंत शेतकऱ्यांचे राज्य” हा यातला “कॉमन फॅक्टर” आहे आणि सुप्रिया सुळे तिथे लक्ष घालणार याचा नेमका राजकीय अर्थ काय आहे??, हे उघडून डोळे बघून नीट ओळखून घेण्याची गरज आहे.
पण ते काही असले तरी या निमित्ताने राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या कवचातून बाहेर पडल्याची पडण्याचा प्रयत्न करते आहे, एवढे मात्र सांगता येईल!! आता त्यात यश किती येईल??, हा भाग अलहिदा!!
NCP@25 : executive presidents, will they be able to work or it will like non performing star campaigners??
महत्वाच्या बातम्या
- धुळ्यातील टिपू सुलतानच्या बेकायदेशीर स्मारकावर बुलडोझर, AIMIM आमदाराने उभारले होते, हिंदू संघटनांच्या तक्रारीनंतर कारवाई
- नवीन ‘’डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल’’ लवकरच संसदेत सादर केले जाणार – राजीव चंद्रशेखर
- WATCH : ‘गोडसेही भारताचे सुपुत्र, औरंगजेब आणि बाबरसारखे आक्रमक नव्हते’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचे वक्तव्य
- क्रिकेट चाहत्यांचा फायदा, जियोनंतर आता हॉटस्टार मोफत दाखवणार ICC क्रिकेट वर्ल्डकप, OTT स्पर्धेचा परिणाम