Thursday, 1 May 2025
  • Download App
    राष्ट्रवादी काँग्रेस कात टाकणार : पक्षातील सर्व विभाग, सेल, कार्यकारिणी बरखास्त, नव्या बांधणीत ओबीसींना स्थान देणार|NCP will throw away All departments, cells, executive in the party will be dissolved, OBCs will be given place in the new structure

    राष्ट्रवादी काँग्रेस कात टाकणार : पक्षातील सर्व विभाग, सेल, कार्यकारिणी बरखास्त, नव्या बांधणीत ओबीसींना स्थान देणार

    प्रतिनिधी

    मुंबई : ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या विभाग आणि सेलच्या कार्यकारिणी बरखास्त केल्या. नवीन कार्यकारिणीत ओबीसींना स्थान देण्याचा यामागे उद्देश असल्याचे मानले जात असून सगळ्या सेलच्या प्रमुखांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांनी पत्रे पाठवली आहेत. यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युथ काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला वगळण्यात आले.NCP will throw away All departments, cells, executive in the party will be dissolved, OBCs will be given place in the new structure

    राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल पटेल यांच्या सहीचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात पक्षाचे सर्व विभाग आणि सेल पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने बरखास्त करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेल आणि विभागावर आता नव्या नियुक्त्या केल्या जातील.



    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पवारांकडून स्वागत

    सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या अहवालातील शिफारशी स्वीकारून ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास आज मान्यता दिली. न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी सुरू असलेली न्यायालयीन लढाई महाराष्ट्राने आज जिंकली याचे समाधान वाटते, असे पवारांनी म्हटले आहे.

    मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करत राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. ओबीसी समाजासोबत आम्ही नेहमीच असून त्यांच्या उन्नतीची बांधिलकी कायमच राहील, याचा पुनरुच्चार या निमित्ताने करतो, असे टि्वटही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केले.

    NCP will throw away All departments, cells, executive in the party will be dissolved, OBCs will be given place in the new structure

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    फडणवीस सरकारने स्वतःच घेतलेल्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास; पण काही विभागांमध्ये नापास!!

    Chief Minister Fadnavis : जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने सामाजिक न्यायाचे पर्व सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही केले निर्णयाचे स्वागत

    Sarsanghchalak : सरसंघचालकांच्या हस्ते काशीमध्ये मजुराच्या मुलीचे कन्यादान; वराला म्हणाले- माझ्या मुलीची काळजी घ्या!