प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा दिलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा 354 कलमानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोठा राजकीय बवाल उभा केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले विचारवंत, लिबरल कार्यकर्ते गप्प असताना हेरंब कुलकर्णी यांनी मात्र राष्ट्रवादीला करुणा शर्मा मुंडे प्रकरणाची आठवण करून दिली आहे. NCP was reminded of the Karuna Sharma Munde case
आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर हेरंब कुलकर्णी यांनी राष्ट्रवादीला एक आठवण या शीर्षकाने एक पोस्ट केली आहे. ती अशी :
राष्ट्रवादीसाठी एक आठवण
जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा महाराष्ट्रातील राजकारणाचा राजकीय स्तर अधिक तळाकडे ढकलणारा आहे, त्याचा निषेधच आहे.
पण आज राष्ट्रवादीचे सारे नेते ज्या सात्विक संतापाने खोटा गुन्हा कसा या विषयावर अस्वस्थ होऊन बोलत आहेत ते बघताना मला करुणा मुंडे आठवल्या. राष्ट्रवादीचेच धनंजय मुंडे यांच्या गावात त्या पत्नीच्या नात्याने गेल्या तेव्हा त्यांच्या गाडीत पिस्तुल टाकली गेली. समोरच्या अनोळखी महिला कोण आहेत हे माहिती नसताना त्यांच्यावर त्या महिलांनी थेट अट्रोसिटी टाकली गेली.
त्या १४ दिवस तुरुंगात होत्या. स्वतःच्या पत्नीवर इतक्या खालच्या पातळीवर खोटे गुन्हे टाकणाऱ्या व त्यांना तुरुंगात टाकणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या या वर्तनाविषयी राष्ट्रवादी चा एकही नेता तेव्हा बोलला नाही किंवा केसेस मागे घेण्याविषयी सांगितले नाही आणि हेच आज सारे नेते खोटे गुन्हे या विषयावरून नैतिक मुद्दे मांडत आहेत.
फक्त त्या प्रसंगांची आठवण
– हेरंब कुलकर्णी
NCP was reminded of the Karuna Sharma Munde case
महत्वाच्या बातम्या
- सातव्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा; ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
- देशात योग्य वेळ येताच सामान नागरी कायदा लागू; गृहमंत्री अमित शाहांचे स्पष्ट प्रतिपादन
- सक्तीच्या धर्मांतरातून राष्ट्रीय सुरक्षेलाच धोका; सुप्रीम कोर्टाचे परखड निरीक्षण; रोखण्यासाठी काय उपाय करताय?, केंद्राला विचारणा
- ‘रोज असे लाखो विनयभंग होतात’; ‘मर्द असाल तर मैदानात येऊन लढा’; जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीची वक्तव्ये; मानसिकता काय दाखवते?