वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई – गोवा क्रूज ड्रग्स पार्टीवर कायदेशीर कारवाई करून बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने या अटकेवर आक्षेप घेतला आहे. त्याच्याजवळ ड्रग्स सापडली नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. त्याचबरोबर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोवर भाजपचा पक्षपाती असल्याचा आरोप लावला आहे. या आरोपांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. NCP want to go the court, they can go & seek justice. We will reply there. We have done everything as per law
क्रूज ड्रग्स रेव्ह पार्टी संदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने गुप्त माहितीच्या आधारे कायदेशीर कारवाई केली आहे. त्यामध्ये कोणताही राजकीय सहभाग नाही, असे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपसंचालक ग्यानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या समवेत वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे हेदेखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते. राष्ट्रवादीला यात कोणाचा राजकीय हात असल्याचे वाटत असेल तर त्यांनी न्यायालयात जावे. आम्ही त्यांना तिथे प्रत्युत्तर देऊ, असा इशारा देखील ज्ञानेश्वर सिंह यांनी दिला.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ही प्रोफेशनल संघटना आहे. तिची कारवाई कायदेशीर निकषांवरच चालते त्यामध्ये राजकीय हस्तक्षेपाचा प्रश्न उद्भवत नाही, याकडे ग्यानेश्वर सिंह यांनी आवर्जून लक्ष वेधले. क्रुज ङ्रग्ज पार्टी संदर्भात आत्तापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली असून या 14 जणांना न्यायालयीन प्रक्रियेनुसार विविध तारखांची कोठडी सुनावण्यात आली आहे. याचा अर्थ न्यायालयाने देखील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेली ही कारवाई कायदेशीर असल्याचे उचलून धरले आहे, असे त्यांनी सांगितले.
नबाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह लावले होते. काही व्यक्तींची नावे घेऊन त्यांनी त्यांचा नार्कोटिक्स ब्यूरोशी संबंध काय? असा सवाल उपस्थित केला होता. त्याला ग्यानेश्वर सिंग यांनी राष्ट्रवादीने हवे तर न्यायालयात जाऊन न्याय मागावा आम्ही त्यांना तिथे प्रत्युत्तर देऊ, असे खणखणीत उत्तर दिले आहे.
NCP want to go the court, they can go & seek justice. We will reply there. We have done everything as per law
महत्त्वाच्या बातम्या
- Jioचे नेटवर्क डाऊन : सकाळी 9.30 पासून Jioच्या नेटवर्कमध्ये समस्या, कॉल आणि इंटरनेट वापरकर्ते त्रस्त
- तालिबानी नेता अनस हक्कानीची महमूद गझनवीच्या कबरीला भेट, सोमनाथ मंदिर विध्वंसाचा केला उल्लेख
- लखीमपूर खीरीप्रकरणी काउंटर एफआयआर दाखल, भाजप कार्यकर्त्याने हत्या, प्राणघातक हल्ला आणि गोंधळाचे केले आरोप
- कुलभूषण जाधव : पाकचे अटर्नी जनरल म्हणाले – कोणत्याही भारतीयाला जाधव यांना एकट्याने भेटू देणार नाही; उच्च न्यायालयाने वकील नियुक्तीची मुदत वाढवली
- तृणमूल प्रवेशापूर्वी त्रिपुराचे भाजप आमदार आशिष दास यांनी केले मुंडन; मंदिरात शुद्धीकरण यज्ञ करून म्हणाले- पापे धुवून टाकली