• Download App
    NCP unification inside story, Pawar family the only beneficiary विलीनीकरणाच्या Inside story तून फक्त शरद पवारांच्या घरातले आणि गटातलेच सगळे नेते लाभार्थी; मग story किती खरी, किती खोटी??

    विलीनीकरणाच्या Inside story तून फक्त शरद पवारांच्या घरातले आणि गटातलेच सगळे नेते लाभार्थी; मग story किती खरी, किती खोटी??

    NCP unification

    नाशिक : दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या inside story तून फक्त शरद पवारांच्या घरातले आणि गटातलचे सगळे नेते लाभार्थी; त्यामुळे मग story किती खरी, किती खोटी??, असा सवाल समोर आला.NCP unification inside story, Pawar family the only beneficiary

    – लाभार्थी सगळे फक्त घरातलेच

    आज दिवसभराच्या घडामोडींनंतर एबीपी माझा आणि टीव्ही नाईन यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची inside story बाहेर काढली. पण या स्टोरीतून शरद पवार गटाचे सगळे नेते लाभार्थी ठरल्याचे उघड झाले. कारण विलीनीकरण झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रीपद, राज्यात अजित पवारांना सर्वाधिकार, पण शरद पवार राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेतेपद, अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष पद, जयंत पाटलांना राज्यात कॅबिनेट मंत्रीपद, तर रोहित पवारांना राज्यात राज्यमंत्रीपद असे सगळे द्यायचे ठरले होते. याचा अर्थ शरद पवारांच्या गटातले स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, जयंत पाटील आणि रोहित पवार हे नेते लाभार्थी ठरले होते.



    विलीनीकरणाची story तुम्ही सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना सांगितली आहे का??, असे अजितदादांना विचारल्यानंतर माझा पक्ष मी चालवतोय, असे अजितदादा दरडावून म्हणाले होते, त्याची साक्ष inside story देणाऱ्या सूत्रांनी काढली होती.

    पण या inside story तूनच दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण किती खरे, किती खोटे??, याची खरी “राजकीय स्टोरी” बाहेर आली.

    – पवारांच्या घरातलेच सगळे लाभार्थी

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणातून फक्त पवारांच्या घरातले सगळे मंत्री झाले असते आणि बाकीच्यांना दोन्ही हात तोंडावर ठेवावे लागले असते. अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष पदाचा सत्तेचा तुकडा मिळाला असता, पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे राजकीय भवितव्य कायमचे झाकोळले असते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांच्या सत्तेच्या तुकड्यात कपात झाली असती. हे अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या बाकीच्या नेत्यांनी मान्य केले असते का??

    – भाजपचे नेते गप्प बसले असते का??

    अजित पवारांनी परस्पर विलीनीकरण करून घेतले असते, तर भाजपने फक्त पवारांच्या घरातल्या नेत्यांना मंत्रिपदे देऊन भाजपचे नेते गप्प बसले असते का??, हा खरा सवाल आहे, पण त्याचे उत्तर एबीपी माझा किंवा टीव्ही‌ 9 च्या inside story ने दिली नाही. पवारांच्या घरातले सगळेजण मंत्री होऊन लाभार्थी ठरणार आणि जणू काही भाजपचे नेते त्यांना मूक संमती देणार, हे या inside story वाल्यांनी गृहीत धरले. पण पवारांच्या घरात सगळी मंत्री पदे देऊन भाजपचे नेते त्यांना डोक्यावर बसवून घेतील का??, हा साधा सवाल सुद्धा inside story वाल्यांच्या मनात आला नाही, मग त्याचे उत्तर घेणे तर दूरच राहिले. इथेच inside story तला फोलपणा उघड्यावर आला.

    NCP unification inside story, Pawar family the only beneficiary

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunil Tatkare : सुनील तटकरे म्हणाले- विलीनीकरणावर आधी शरद पवार गट बोलेल, मग आम्ही बोलू, राऊतांच्या टीकेला महत्त्व नाही

    Ganesh Khankar : मुंबई महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड, अमित साटम यांनी केली घोषणा

    राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत दोन्ही गटांची भांडाभांडी; पण पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप पुढे टाकली नांगी!!