विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गृह मंत्रालयावरची पकड 2014 पासून महाराष्ट्राने व्यवस्थित पाहिली आहे, इतकेच नाही तर 2019 ते 2022 या अडीच वर्षांमध्ये ते विरोधी पक्ष नेते असताना त्यांच्याकडे जी “बिनचूक विशिष्ट माहिती” असायची त्याचेही “सोर्सेस” नेमके कुठे आहेत??, याचीही माहिती महाराष्ट्राला आहे. पण 2022 च्या जून नंतर ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनण्याबरोबरच गृहमंत्री आणि अर्थमंत्री झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे यांची “चक्रे” फिरली!! NCP – Uddhav Thackeray targets home minister devendra Fadanavis, real fear of penalty of law over Dynasty
दरम्यानच्या काळात बऱ्याच घडामोडी झाल्या. राष्ट्रवादीचे दोन मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक आणि त्यानंतर संजय राऊत हे आत मध्ये जाऊन आले. यापैकी नवाब मलिक तर अजूनही आत मध्येच आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये फडणवीसांची गृहमंत्रालयावरची पकड अधिक घट्ट असल्याचे स्पष्ट झाले.
पण सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे यांनी फडणवीसांना त्यांच्या गृह मंत्रालयावरूनच विशिष्ट पद्धतीने टार्गेट करायचे ठरविल्याचे दिसत आहे. राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर, मग ती पुण्यातली कोयता गॅंग असो अथवा छत्रपती संभाजीनगरची दंगल असो यातून राष्ट्रवादी काँग्रेसला फडणवीस हे “मजबूत” गृहमंत्री नसल्याचे ठसवायचे आहे, तर ठाण्यातल्या घटनांमधून ठाकरे गट याच मुद्द्यावर राष्ट्रवादी बरोबर उतरला आहे.
खासदार सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील या तीन नेत्यांनी फडणवीसांच्या गृहमंत्री पदावर ठळक प्रश्नचिन्हे लावली आहेत. यातले उद्धव ठाकरेंनी फडतूस गृहमंत्री हे उद्गार काढल्याने महाराष्ट्रात वादळ उठले आहे, हे खरे पण त्या पलिकडे फडणवीसांना गृहमंत्री म्हणून अपयशी ठरवण्याचा राष्ट्रवादी आणि ठाकरेंचा जो पॅटर्न दिसतो आहे, त्या पॅटर्न मधूनच नजीकच्या भविष्यात घडणाऱ्या विशिष्ट घडामोडींचा घडामोडींची चाहूल दिसते आहे!!
ईडी – सीबीआय स्कॅनर
महाराष्ट्रातले अनेक जण ईडी, सीबीआयच्या स्कॅनर खाली आधीपासूनच आहेत. त्यातच हसन मुश्रीफ आणि त्यांच्याशी व्यावसायिक संबंध असलेले पुण्याचे काही लोक यांच्यावर छापे पडले आहेत. याचे धागेदोरे राष्ट्रवादीमध्ये बरेच खोलपर्यंत असल्याचीही माहिती आहे. त्याचबरोबर पाटणकर प्रकरणाची चौकशीही अद्याप सुरू आहे. सचिन वाझेने आपल्या चौकशीत जे तोंड उघडले आहे त्याचे “दृश्य परिणाम” अजून दिसायचे आहे आहेत.
सीबीआय डायमंड जुबिलीत मोदींचे भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीबीआयच्या डायमंड जुबिली मध्ये केलेल्या भाषणात जे ठळक उल्लेख केले, त्यामध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांना त्यांनी “विशिष्ट पाठबळ” दिले आहे. तुम्ही सीबीआयचे अधिकारी म्हणून ज्यांच्यावर कारवाई करत आहात, ते प्रचंड ताकदवान लोक आहेत. देशातल्या सत्ताधारी गोटामध्ये आणि इकोसिस्टीम मध्ये ते लोक वर्षानुवर्षे राहिले आहेत. त्यामुळे सत्तेतल्या सर्व खाचाखोचा त्यांना पक्क्या माहिती आहेत. अशा ताकदवान लोकांशी लढायचे असेल तर प्रचंड इच्छाशक्तीची गरज आहे आणि ती राजकीय इच्छाशक्ती आमच्याकडे कमी नाही. पण त्या ताकदवान लोकांची लढताना प्रचंड पेशन्स ठेवावा लागेल. तो ठेवून ही लढाई लढावी लागेल, असे ते म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे लघुरूप महाराष्ट्रात गृह मंत्रालयाच्या रूपाने दिसत आहे आणि नेमकी हीच बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि ठाकरे गटाला खटकत आहे.
कायद्याचा वरवंटा फिरण्याची भीती
महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये आणि काही महिन्यांमध्ये कायदेशीर कारवाईचा वरवंटा जोरात फिरण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधींसारख्या देशातल्या सर्वात बड्या घराण्याच्या राजपुत्राची जर खासदारकी रद्द होऊ शकते, तर महाराष्ट्रातल्या घराणेशाहीचे काय होईल?, याची खरी चिंता महाराष्ट्रातल्या दोन घराण्यांना भेडसावत आहे आणि नेमक्या याच राजकीय पार्श्वभूमीवर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची गोची
थेट मोदींना टार्गेट करता येत नाही. तसे केले तर आपले राजकारण समूळ उखडून पडण्याची भीती राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला वाटत आहे. एकीकडे राहुल गांधी लडखडत का होईना, पण मोदींशी टक्कर घेत आहेत. पण काँग्रेसची काही अंशी चा होईना पण भीती मनात असल्याने आणि काँग्रेसच्याच मतपेढीला पोखरायचे असल्याने थेट मोदींना दुखवून राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला चालणार नाही. म्हणून मग मधल्या फळीतले नेते म्हणून फडणवीसांना टार्गेट करणे सुरू आहे आणि त्यातही ते गृहमंत्री म्हणून राष्ट्रवादी आणि ठाकरेंना नको आहेत. हा यातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे किंबहुना हेच नेमके फडणवीसांना टार्गेट करण्यात येण्यातले राजकीय इंगित आहे!!
NCP – Uddhav Thackeray targets home minister devendra Fadanavis, real fear of penalty of law over Dynasty
महत्वाच्या बातम्या
- बऱ्याच दिवसांनी आझाद बाहेर आले आणि बोलले; बरे झाले सुटलो, राहुल गांधींमागे फिरणाऱ्यांमध्ये मी नाही!!
- राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीम समुद्रातली मजार हटविल्यानंतरही तेथे संशयास्पद हालचाली!!
- ‘’फडणवीसांवर टीका करताना तोंड सांभाळून बोला, आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे, यानंतर बोललात तर…’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम!
- ‘’आमचे गृहमंत्री “फडतूस” नाही “काडतूस” आहेत!’’ आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार
- ‘’…तर राहुल गांधींच्या फोटोला चपला मारण्याचं काम उद्धव ठाकरे तुम्ही आणि तुमच्या सेनेने केलं असतं’’ देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला!