नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) NCP SP अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजप सोडून इतर पक्षांशी युती करायची तयारी केली, त्याबरोबर पवारांच्या आमदारांच्या मनात वेगळीच भीती रुतून बसली. पवारांनी भाजप सोडून इतर पक्षांशी युती केली तर पुढची 5 वर्षे आपल्याला सत्तेची वळचण मिळणे तर सोडाच, उरली सुरली आमदारकी देखील भविष्यात टिकेल की नाही, याविषयी दाट संशय निर्माण झालाय.
कारण राष्ट्रवादी काँग्रेसने (शप) भाजप सोडून इतरांशी युती केली, तर शरद पवारांचे धकून जाईल. आपण राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी सोडली नाही, अशी टिमकी त्यांना वाजवता येईल, पण आपल्याला मात्र मतदारसंघ कुठले काम करायला निधी मिळणार नाही. त्यामुळे कुठली कामे होणार नाहीत आणि त्याबद्दल जनता आपल्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, याची भीती शरद पवारांच्या आमदारांना वाटू लागली आहे. त्यामुळेच त्यांनी कसेही करून कुठूनही भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाण्याचा आग्रह धरला आहे. NCP SP
पवारांची पहिली पुडी फुटली
पण यात देखील फार मोठी गोम दडली आहे. एकीकडे शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाची पुडी सोडून पाहिली, तरी त्यातला धोका ओळखून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी ती चर्चाच विझवून टाकली. दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या, तर पवारांची मुलगी आणि पवारांचा पुतण्या यांना भाजप राजकारणात settle करेल, पण मधल्या मध्ये आपले पत्ते कट होतील, याची धास्ती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वाटली म्हणून त्यांनी पवारांचा एकीकरणाचा प्रस्ताव धुडकावून लावला.
म्हणून दुसरी पुडी सोडली
अजितदादांच्या राष्ट्रवादीतून एकीकरणाचा प्रस्ताव असा धुडकावला गेल्यानंतर पवारांना भाजप सोडून इतर पक्षांशी युती करायची दुसरी पुडी सोडावी लागली. पण ही पुडी सुटताच बाकीच्या पक्षांमध्ये खळबळ माजण्याच्या ऐवजी खुद्द शरद पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ माजली. कारण भाजप सोडून इतर पक्षांशी युती झाली, तरी भाजपची सत्ता राज्यातून हटत नाही आणि ती सत्ता हटली नाही, तर आपल्याच पक्षात फाटाफूट होऊन काही आमदार भाजपला जाऊन मिळतील आणि स्वतःची सत्तेची पोळी पिकवून घेतील अशी भीती पवारांच्या राष्ट्रवादीत निर्माण झाली. त्याचबरोबर भाजपने कसेही करून सत्ता टिकवली, तर आपली पुढली कम्बख्ती ओढविल्याशिवाय राहणार नाही. मतदारसंघातली कामे करायला निधी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे जनता आपल्याला पुढे अजिबात विचारणार नाही, याची धास्ती पवारांच्या आमदारांना वाटायला लागली.
खासदार आणि आमदार उभी फुट
पण इथेही आणखी मोठी गोम दडल्याचे समोर आले. पवारांच्या खासदारांचा भाजप विरोधाला पाठिंबा आणि आमदारांचा मात्र विरोध असले विरोधाभासी चित्र समोर आले. त्यामुळे पवारांच्या दोलायमान राजकारणात इतर पक्षांशी युती होवो किंवा न होवो, खुद्द पवारांच्याच पक्षात खासदार आणि आमदार यांच्यात उभी फूट पडायची दाट शक्यता निर्माण झाली.
NCP SP MLA’s feared to go against BJP
महत्वाच्या बातम्या
- Karnataka : बेल्लारीतील काँग्रेस खासदार अन् कर्नाटकातील तीन आमदारांवर EDचे छापे
- DK Shivakumar : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार विराट कोहलीची RCB टीम खरेदी करणार?
- Rajiv Ghai : ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्या मुलीची भावनिक पोस्ट चर्चेत!
- Rahul Gandhi : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, आता उपस्थित केला ‘हा’ मुद्दा!