विशेष प्रतिनिधी
मुंबई : NCP शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात महाविकास आघाडीतून 288 पैकी 80 ते 85 जागा लढवण्याची शक्यता आहे. उद्यापासून पक्षाचे नेते इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. स्वतः शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील 24 नेत्यांचे पार्लमेंटरी बोर्ड इच्छुकांच्या मुलाखतींसाठी नेमले आहे. NCP SP candidature interviews from today
कारण महाविकास आघाडीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यातच खरी रेटारेटी आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या वाट्यांना ट्रिपल डिजिट, म्हणजे 100 ते 105, तर पवारांच्या पक्षाच्या वाट्याला डबल डिजिटच 80 ते 85 जागा येऊ शकतात.
या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षाने आजपासून म्हणजे 5 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर असे 3 दिवस इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आखला आहे. 5 ऑक्टोबरला मराठवाडा, 6 तारखेला विदर्भ, 7 ऑक्टोबरला, तर महाराष्ट्रातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 24 नेत्यांचे पार्लमेंटरी बोर्ड इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयात या मुलाखती होणार आहेत.
कुठल्याही निवडणुकीत जागा लढवणार मुठभर, पण स्टार प्रचारकांची यादी हातभर हा सगळ्याच प्रादेशिक पक्षांचा खाक्या असतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्ष देखील त्याला अपवाद नाही.
NCP SP candidature interviews from today
महत्वाच्या बातम्या
- ‘…त्यातील एका मागणीची आज पूर्तता झाली’ ; राज ठाकरेंची विशेष प्रतिक्रिया
- Marathi : मोदी सरकारने मराठीला दिला अभिजात भाषेचा दर्जा; पण तो काँग्रेसला मात्र टोचला!!
- Karnataka : कर्नाटकचे आरोग्यमंत्री अडचणीत, सावरकरांचे नातू करणार मानहानीचा दावा
- Siddaramaiahs : सिद्धरामय्या यांच्या अडचणी वाढल्या; आता MUDA प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा आरोप!