• Download App
    NCP-SCP NCP-SCP : समाजवादी पार्टीला पवारांकडून

    NCP-SCP : समाजवादी पार्टीला पवारांकडून वाटाण्याच्या अक्षता; पण त्याच पार्टीतून खेचून घेऊन तिकीट स्वरा भास्करच्या पतीला!!

    NCP-SCP

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : NCP-SCP राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी मुंबईत मोठ्या डाव टाकून समाजवादी पार्टीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या पण त्याच पार्टीतून खेचून घेऊन स्वरा भास्करचा पती फहाद अहमद याला नवाब मलिकांच्या मुलीविरुद्ध तिकीट दिले.NCP-SCP



    अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीत फक्त 5 जागा मागितल्या आहेत, पण त्या देखील त्याची तयारी महाविकास आघाडीतल्या कुठल्याच मोठ्या घटक पक्षांची नाही. त्या उलट शरद पवारांनी समाजवादी पार्टीवरच मुंबईत डाव टाकून त्यांचा उमेदवार आपल्या पक्षात खेचून आणला. बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा पती जेएनयू ऍक्टिव्हिस्ट फहाद अहमद याला राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट दिले. ते तिकीट त्यांनी सना नवाब मलिक हिच्याविरुद्ध अणुशक्ती नगर मधून दिले.

    फहाद अहमद हा दिल्लीतल्या शाहीन बागेतील वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये सामील होता. नंतर त्याने समाजवादी पार्टीचे काम सुरू केले होते. दरम्यानच्या काळात त्याचे आणि स्वरा भास्करचे प्रेम जमले. त्या दोघांनी लग्न केले. आता विधानसभा निवडणुकीची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्याने समाजवादी पार्टीला सोडून दिले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून तिकीट मिळवले. पण या सगळ्यात समाजवादी पार्टीला पवारांच्या पक्षाने वाटाण्याच्या अक्षता लावून ते मोकळे झाले.

    NCP-SCP: Samajwadi Party’s inability to share with Pawar; But the ticket to Swara Bhaskar’s husband was pulled from the same party!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    17 मुले आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर; त्याला कुणाशी, कशासंदर्भात बोलायचे होते??, प्रश्न अनुत्तरीत!!

    सत्याच्या मोर्चाची दुसरी बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये; राज आणि उद्धव हजर, पण पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मात्र गैरहजर, बैठकीचे महत्त्व राहिलेच काय??

    Maharashtra SEC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट नाहीच; कायद्यात तरतूद नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण