• Download App
    पवारांचा पक्ष मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत बॅकफूट वर; पण अजितदादांच्या पक्षातून आमदार खेचण्यात फ्रंटफूट वर!!}NCP-SCP on the back foot over chief ministerial candidate, but trying to snatch ajit pawar's NCP's mlas

    पवारांचा पक्ष मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत बॅकफूट वर; पण अजितदादांच्या पक्षातून आमदार खेचण्यात फ्रंटफूट वर!!

     विशेष प्रतिनिधी2

    मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वीच शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्री पदाच्या चर्चेमध्ये आपापल्या रिंग टाकून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बॅकफूटवर टाकले, पण पवारांची राष्ट्रवादी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार आपल्याकडे खेचण्यामध्ये मात्र फ्रंटफूट वर आल्याची बातमी आहे.NCP-SCP on the back foot over chief ministerial candidate, but trying to snatch ajit pawar’s NCP’s mlas

    लोकसभा निवडणुकीतल्या चांगल्या परफॉर्मन्स नंतर फॉर्मत आलेल्या काँग्रेसने महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत स्वतःची रिंग पहिल्यांदा टाकली. ज्याचे आमदार जास्त, त्या पक्षाचा मुख्यमंत्री!!, ही भूमिका काँग्रेसने थेट केंद्रीय पातळीवर घेतल्याचे बोलले गेले. त्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेस महाविकास आघाडीत बाकीच्या पक्षांशी तडजोड करणार नाही. आमदार संख्येच्या बळावर मुख्यमंत्री वर आपल्याकडे खेचून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल हे उघड झाले.



    या पार्श्वभूमीवर शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या नावावर तडजोड करायची नाही असेच सांगून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची रिंग मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत टाकली. स्वतः उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत महायुतीचा पराभवाचा चेहरा समोर येऊ द्या, मग आम्ही आमचा विजयाचा चेहरा समोर आणू, असे म्हटले असले तरी शिवसेना मुख्यमंत्री पदाच्या तडजोडीसाठी प्रतिकूल असल्याचे स्पष्ट झाले.

    काँग्रेस आणि शिवसेना मुख्यमंत्री पदावरून तडजोड करणार नसल्याने त्यांची स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी देखील सुरू झाली. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षातून मुख्यमंत्रीपदासाठी कुणाचे नावच पुढे येईनासे झाले. शरद पवार हे सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करत असल्याचे गेले कित्येक वर्ष मराठी माध्यमे बातम्या देत आहेत. परंतु प्रत्यक्षात मित्रपक्षांपैकी कोणीच सुप्रिया सुळे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्यायलाच तयार नाही. खुद्द शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधूनही पोस्टरवरच्या नावाखालीच सुप्रिया सुळे यांचे नाव कुठेच दिसायला तयार नाही.

     अजितदादांचे 15 – 20 आमदार पवारांच्या वाटेवर!!

    मात्र शरद पवारांची काँग्रेस एकाबाबतीत फ्रंटफूट वर आल्याची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे अजित पवारांचे 15 ते 20 आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची बातमी मराठी माध्यमांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आघाडी मिळाली, त्या मतदारसंघांमधले अजित पवारांचे विद्यमान आमदार अस्वस्थ असल्याने ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर निघाल्याची ही बातमी आहे. त्यामुळे पवारांचा ताटातले वाटीत वाटीतले ताटात हा प्रयोग विधानसभा निवडणुकीच्या आधी रंगणार आहे. शरद पवारांकडे देखील संबंधित विधानसभा मतदारसंघांमध्ये लढण्यासाठी तगडे उमेदवार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळाची सुरू झाली आहे .त्यामुळे अजित पवारांचे आमदार आपल्याकडे खेचून घेण्याखेरीज त्यांना नवा पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.

    NCP-SCP on the back foot over chief ministerial candidate, but trying to snatch ajit pawar’s NCP’s mlas

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस