प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही पत्रकारपरिषदेत जाहीर केले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. कालच्या महाभूकंपानंतर आजही मोठ्या घडमोडी घडल्या असून, ‘’जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केलं आहे. सुनील तटकरे यांची नियुक्ती केली आहे. अजित पवार यांची गटनेतेपदी, तर अनिल पाटील यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.” अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. NCP Political Crisis Sunil Tatkare NCP State President Ajit Pawar Group Leader said Praful Patel
याशिवाय, अजित पवार यांना आमदारांनी विधिमंडळाचा नेता म्हणून नियुक्त केलं आहे. अधिकृतपणे ते विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची जबाबदारी सांभाळतील. तसेच, आम्ही प्रतोद म्हणून अनिल पाटील यांना जबाबदारी कायम ठेवली आहे. तसं मी विधानसभा अध्यक्षांना कळवलं आहे. आम्ही सर्व अधिकृतपणे सर्व पार पाडलं आहे. विधानसभा सत्र होणार आहे, अशात ह्या नियुक्त्या केल्या आहेत, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.
आम्ही सुचित करु ईच्छितो की संघटनात्मक दृष्टीनं नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या मागच्या दिल्लीच्या 21 जूनच्या कार्यक्रमात मला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. मात्र सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं होतं त्यानंतर पक्षाच्या वर्किंगमध्ये उपाध्यक्ष नियुक्त झालो होतो. तेव्हा मी काही नियुक्त्या जाहीर केल्या होत्या, यात जयंत पाटील यांची हंगामी नियुक्ती केली होती . तात्काळ व्यवस्था असावी त्यासाठी त्यांना जबाबदारी दिली होती, त्यापार्श्वभूमीवर आम्ही जयंत पाटील यांना कळवलं आहे, त्यांना मुक्त करतोय. असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.
NCP Political Crisis Sunil Tatkare NCP State President Ajit Pawar Group Leader said Praful Patel
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांना दिली पक्ष प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी
- रात्रीस खेळ चाले; अजितदादांसह 9 मंत्र्यांवर राष्ट्रवादीने टांगली अपात्रतेची तलवार!!; विधानसभा अध्यक्षांना पाठविला ई-मेल आणि व्हॉट्स एप!!
- रात्रीस खेळ चाले; अजितदादांसह 9 मंत्र्यांवर राष्ट्रवादीने टांगली अपात्रतेची तलवार!!; विधानसभा अध्यक्षांना पाठविला ई-मेल आणि व्हॉट्स एप!!
- मोदींची 2019 ची मूळ योजना फलद्रूप; भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र, काँग्रेस एकाकी, त्यात ठाकरे – पवारांची भर!!