• Download App
    भाजपच्या 'कॉफी टेबल बुक'ला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध|NCP opposes BJP's 'Coffee Table Book

    भाजपच्या ‘कॉफी टेबल बुक’ला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : निरुपयोगी कॉफी टेबल बुकसाठी स्वार्थी हेतूने पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर सत्ताधाऱ्यांनी दरोडा टाकला आहे, असा आरोप करत याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात आज तीव्र आंदोलन करण्यात आले. “गली गली में शोर है, भाजपा चोर है”, “भ्रष्टाचारी भाजपचा धिक्कार असो” अशा घोषणांनी पुणे महानगरपालिकेचा परिसर दणाणून सोडला. NCP opposes BJP’s ‘Coffee Table Book’

    विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, रविंद्र माळवदकर, प्रवक्ते प्रदीप देशमुख नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका रेखा टिंगरे,स्मिता कोंढरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलचे शहराध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



    महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना निरुपयोगी कॉफी टेबल बुकसाठी मात्र महानगरपालिकेची तिजोरी ओसंडून वाहत आहे, अशी टीका जगताप यांनी केली. ते म्हणाले की, कॉफी टेबल बुकमध्ये मात्र कोरोनाच्या काळात पुणेकरांचे झालेले हाल जगासमोर मांडले जाणार आहेत. पुणे शहराच्या इतिहासातील एक काळा अध्याय कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून जगाला सांगण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून या गोष्टीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विरोध आहे.

    याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने डॉ. आशिष भारती ( आरोग्य प्रमुख )यांना निवेदन दिले आहे, तसेच या निविदेची चौकशी करण्यासाठी नगरविकास विभाग, गृह विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सीआयडी यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात येणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

    कोरोनाच्या भयावह संकटात पुणे शहरातील तब्बल ९११४ नागरिकांनी आपले प्राण गमावले. ​मात्र कोरोनाच्या काळात केलेल्या कामांची जाहिरात करण्यासाठी सत्ताधारी भाजपने सामान्य पुणेकरांच्या हक्काच्या निधीस हात घातला आहे. या माध्यमातून आपल्या काही हितचिंतकांचा आर्थिक फायदा व्हावा हाच भाजपचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला.

    महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने पुणेकरांच्या उन्नतीकडे दुर्लक्ष करून केवळ भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातीकडे लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच एरवी विकासकामांसाठी कोरोनाच्या काळात पुणेकरांचे झालेले हाल आपण सर्वांनीच बाघितले आहेत. जम्बो कोविड हॉस्पिटल व इतर सुविधांची पुणेकरांना नितांत आवश्यकता असताना पैसेच नाही असं रडगाणे सत्ताधारी भाजपने मांडले.

    NCP opposes BJP’s ‘Coffee Table Book

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा