विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत थोरला आणि धाकटा भाऊ असा वाद सुरू असताना प्रत्यक्ष आकडेवारीची स्थिती पाहिली, तर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी राष्ट्रवादीने केल्यानुसार राष्ट्रवादी थोरला भाऊ तर ठरत नाहीच, उलट तो धाकटाही ठरत नाही, तर तिसऱ्या क्रमांकाचा भाऊ ठरतो, असे लोकसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीचे आकडे सांगतात.NCP not number 1 party in MVA as per percentage of 2019 loksabha Elections
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पेक्षा 3 जागा जास्त मिळवल्या हे खरे, पण मतांच्या टक्केवारीत मात्र काँग्रेसच राष्ट्रवादी पेक्षा पुढे असून राष्ट्रवादी महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत 15.66% मते मिळाली आहेत आणि त्यांचे 4 खासदार निवडून आले आहेत, तर काँग्रेसला 16.41 % मते मिळाली असून त्यांचा बाळू धानोरकर यांच्या रूपाने फक्त एकच खासदार निवडून आला आहे.
पण भाजप, अखंड शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात क्रमवारीनुसार मतांच्या टक्केवारीत राष्ट्रवादी चौथ्या नंबर वर आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेत फूट पडल्यानंतर देखील शिवसेनेच्या मतांची टक्केवारी घटली असे दिसत असले, तरी प्रत्यक्षात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आजही 5 खासदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत खासदार संख्येच्या बाबतीत राष्ट्रवादी थोरला भाऊ नव्हे, तर शिवसेनेचा ठाकरे गटच थोरला भाऊ ठरतो. म्हणजे खासदार संख्येच्या आधारावर महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट प्रथम क्रमांकावर, राष्ट्रवादी द्वितीय क्रमांकावर आणि काँग्रेस तृतीय क्रमांकावर असे पक्षीय बलाबल होते.
त्यामुळे अजित पवारांनी खासदार आणि आमदार संख्येच्या बळावर आता राष्ट्रवादी महाविकास आघाडीत थोरला भाऊ आहे, असा दावा केला असला, तरी तो फक्त विधानसभा आमदारांच्या संख्येपुरता मर्यादित आहे. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी आणि खासदार संख्या हा निकष लावल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर घसरते ही वस्तुस्थिती आहे.
NCP not number 1 party in MVA as per percentage of 2019 loksabha Elections
महत्वाच्या बातम्या
- पुणे महानगरपालिकेचं पुरोगामी पाऊल; तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेतलं जाणार
- बिग बॉस मध्ये गेल्यावर भल्याभल्यांची इमेज खराब होते माझी मात्र सुधारली.. तृप्ती देसाई..
- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच सावरकर जयंतीचा आठवडाभर प्रचंड धुमधडाका!!
- भाजपा २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ओडिशातील एक कोटी कुटुंबांशी साधणार संपर्क