• Download App
    एनआयएच्या आरोपपत्रावर राष्ट्रवादीची टीका, नवाब मलिक म्हणाले- अनिल देशमुखांना भाजपच्या सांगण्यावरून फसवले! । NCP Nawab Malik Criticized NIA charge sheet, says Anil Deshmukh was framed on behest of BJP by parambir singh

    NIA Charge Sheet : एनआयएच्या आरोपपत्रावर राष्ट्रवादीची टीका, नवाब मलिक म्हणाले- भाजपच्या सांगण्यावरून अनिल देशमुखांना अडकवलंय!

     NIA charge sheet : अँटिलिया प्रकरणात एनआयएच्या आरोपपत्राने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक म्हणाले की, एनआयएच्या आरोपपत्रात सचिन वाजेला मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत आहोत की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. NCP Nawab Malik Criticized NIA charge sheet, says Anil Deshmukh was framed on behest of BJP by parambir singh


    वृत्तसंस्था

    मुंबई : अँटिलिया प्रकरणात एनआयएच्या आरोपपत्राने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक म्हणाले की, एनआयएच्या आरोपपत्रात सचिन वाजेला मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत आहोत की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत.

    नवाब मलिक म्हणाले की, परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री आणि इतरांची दिशाभूल केली आहे. ते बंद दाराआड वाजेला भेटले. दोषारोपपत्रात मिळालेल्या माहितीनुसार, हेराफेरीच्या मागे असलेल्या व्यक्तीची चौकशी केली जात नाही. सिंह यांनी भाजपच्या सांगण्यावरून मंत्र्याला गोवले आहे.

    एनआयएच्या आरोपपत्रावर राजकारण होऊ नये

    दुसरीकडे, भाजप आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणावर सांगितले की, एनआयए आपले काम करत आहे. जे एनआयएच्या आरोपपत्रावर प्रश्न उपस्थित करत आहेत, ते न्यायालयात जाऊ शकतात. NIAच्या आरोपपत्राचा वापर राजकारण करण्यासाठी करू नये.

    एनआयएच्या तपासात अनेक खुलासे

    एनआयएच्या तपासात परमबीर सिंह आणि सचिन वाजे यांच्याबाबत मोठे खुलासे होत आहेत. ईशान सिन्हा नावाच्या सायबर तज्ज्ञाने एनआयएला दिलेला जबाब खूपच धक्कादायक आहे. जैश-उल-हिंदने अंबानी कुटुंबाला दिलेल्या धमकीबद्दल टेलीग्रामवर ईशानकडून सुधारित अहवाल परमबीर सिंहांनी बनवला होता. इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटानंतर ईशानने दिल्ली स्पेशल सेलला हाच अहवाल दिला होता.

    बनावट अहवाल दिल्याचा आरोप

    ईशानने तोच अहवाल बदलला आणि परमबीर सिंहांच्या सांगण्यावर एक धमकी देणारे पोस्टर लावून बनावट अहवाल बनवला. जेणेकरून अंबानींना धमकी तिहारमधून आली होती हे सिद्ध करता येईल. या अहवालाच्या बदल्यात परमबीर सिंह यांनी ईशानला त्यांच्या केबिनमध्ये 5 लाख रुपये दिले होते.

    24-25 फेब्रुवारीच्या मध्यरात्री अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. जिलेटिनच्या काड्यांव्यतिरिक्त त्या कारमध्ये धमकीचे पत्रदेखील सापडले. या घटनेची जबाबदारी एका टेलिग्राम चॅनेलवरून जैश-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेने स्वीकारली. मार्च 2021 मध्ये या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला.

    NCP Nawab Malik Criticized NIA charge sheet, says Anil Deshmukh was framed on behest of BJP by parambir singh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य