• Download App
    खासदार डॉ. अमोल कोल्हे : काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थिती; आज शिवाजीराव आढळरावांच्या मुलाच्या सिनेमाला शुभेच्छा!! NCP MP dr. Amol Kolhe meets CM eknath shinde and then gives best wishes to shivajirao adhalrao Patel's son, raised eyebrows in political circles

    खासदार डॉ. अमोल कोल्हे : काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थिती; आज शिवाजीराव आढळरावांच्या मुलाच्या सिनेमाला शुभेच्छा!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. या पार्श्वभूमीवर संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काल 31 जानेवारी रोजी अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला हजेरी लावली. तेथे त्यांनी पुणे – नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरीवर भगवा ध्वज उभा करण्याची मागणी आणि अन्य मागण्या केल्या. NCP MP dr. Amol Kolhe meets CM eknath shinde and then gives best wishes to shivajirao adhalrao Patel’s son, raised eyebrows in political circles

    मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदारांनी आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी पाठ फिरवली होती. मात्र, खासदार डॉ. अमोल कोल्हे या बैठकीला उपस्थित होते. आपल्या फेसबुक अकाउंट वर पोस्ट लिहून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे फोटो शेअर करून त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

    आज डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरचे माजी खासदार आणि आपले राजकीय प्रतिस्पर्धी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मुलगा अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या टर्री सिनेमाला फेसबुक पोस्ट लिहून शुभेच्छा दिल्या आहेत.

    या फेसबुक पोस्ट मध्ये डॉक्टर अमोल कोल्हे म्हणतात : मनःपूर्वक शुभेच्छा! श्री. अक्षय शिवाजीराव आढळराव यांच्यासारखा तरूण उद्योजक निर्माता म्हणून पदार्पण करतो आहे याचा मनस्वी आनंद आहे.
    टर्री हा सिनेमा तरूणाईला सकारात्मक प्रेरणा देणारा, सामाजिक भान जपणारा असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
    सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा!!!
    टीप:- राजकारण व कलाक्षेत्र भिन्न आहेत.. कृपया दोन्हीची गल्लत करू नये व राजकीय अर्थ काढू नयेत.
    Shivajirao Adhalrao Patil

    राजकारण आणि कलाक्षेत्र भिन्न आहेत. कृपया दोन्हींची गल्लत करू नये आणि राजकीय अर्थ काढू नये, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. मात्र मराठी प्रसार माध्यमांमध्ये या संदर्भात वेगवेगळी राजकीय चर्चा आधीपासून अस्तित्वात आहे. अमोल कोल्हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असले तरी भविष्यकाळात ते कोणत्या राजकीय दिशेने वाटचाल करणार?, त्यांना कोणत्या राजकीय संधी आणि पर्याय उपलब्ध आहेत?, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

    NCP MP dr. Amol Kolhe meets CM eknath shinde and then gives best wishes to shivajirao adhalrao Patel’s son, raised eyebrows in political circles

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!