Tuesday, 13 May 2025
  • Download App
    भगूरमध्ये सावरकर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांची 100 कोटींची मागणी NCP MLA Saroj Ahire's demand of 100 crores for Savarkar International Memorial in Bhagur

    भगूरमध्ये सावरकर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांची 100 कोटींची मागणी

    प्रतिनिधी

    नागपूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव भगूर येथे त्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी राज्य शासनाने पुरवणी मागण्यांमधून शंभर कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी आग्रही मागणी देवळाली भगूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी शिंदे – फडणवीस सरकारकडे केली आहे. NCP MLA Saroj Ahire’s demand of 100 crores for Savarkar International Memorial in Bhagur

    पुरवणी मागण्यांवर विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान सहभाग घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी भगूर मधील सावरकर स्मारकाचा उल्लेख केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेले भगूर गाव आपल्या मतदारसंघात येते याचा अभिमान वाटत असल्याचे सांगून सावरकरांचा जाज्वल्य इतिहास आंतरराष्ट्रीय पातळीवर जनतेसमोर येण्यासाठी त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक भगूर गावात उभे राहिले पाहिजे यासाठी शासनाने 100 कोटी रुपयांची तरतूद या पुरवणी मागण्यांमध्ये करावी, अशी मागणी सरोज अहिरे यांनी केली.


    सावरकर प्रेमींच्या संतापानंतर नाशिकच्या साहित्य संमेलन गीतात झाला बदल!!


    त्याचबरोबर भगूर गावातून वाहणाऱ्या दारणा नदीतून जे दूषित पाणी वाहून शेती आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात त्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी देखील एक प्रकल्प मंजूर करावा अशी मागणी त्यांनी केली.

    स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने काही ना काही टीका करत असतात तर शिवसेना आणि भाजपचे आमदार सावरकरांच्या समर्थनासाठी आग्रही असतात. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार असलेल्या सरोज अहिरे यांनी भगूर मध्ये सावरकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार करण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी करण्याला वेगळे राजकीय महत्त्व आहे.

    काही दिवसांपूर्वी सरोज अहिरे आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन अधिवेशनाला हजर राहण्यासाठी नागपूरला पोहोचल्या. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आपल्या लहानग्या बाळाचे संगोपन करताना सरोज अहिरे आपल्या राजकीय आणि सामाजिक कर्तव्याला विसरला नाहीत, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. नागपूर विधान भवनात त्यांच्यासाठी खास हिरकणी कक्ष सुरू केला. त्याचे उद्घाटन देखील सरोज अहिरे यांच्या हस्ते करण्याचे औचित्य मुख्यमंत्र्यांनी दाखविले. आता सरोज अहिरे यांनी सावरकर जन्मभूमी असलेल्या भगूर गावात त्यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक तयार करण्यासाठी 100 कोटींची मागणी करणे यातून त्या राजकीय दृष्ट्या शिवसेना आणि भाजपच्या जवळ गेल्याचे दिसून येत आहे.

    NCP MLA Saroj Ahire’s demand of 100 crores for Savarkar International Memorial in Bhagur

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस