पिंपरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला पोलिसानी अटक केली आहे. खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. NCP MLA Anna Bansode’s son finally arrested, case of two attempted murders
विशेष प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला पोलिसानी अटक केली आहे. खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे.
आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे, पीए यांच्यासह 8 ते 9 जणांवर अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपुर्वी एका ठेकेदाराच्या मॅनेजरने आमदार बनसोडे यांच्यावर गोळीबार केल्याचे प्रकरण गाजले होते. गोळीबार करणारा आरोपी तानाजी पवार याच्यासह तिघांवर आमदार आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्यासाठी गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलीस तपासात सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारांनी पवार याचे अपहरण केले होते. त्याला जबर मारहाण केली होती. त्यामुळे जिवाच्या भीतीने पवार याने गोळीबार केल्याचे समोर आले होते.
आमदार बनसोडे पवार याला धमकावत असल्याची क्लिप समोर आली होती. त्यातूनच सिद्धार्थ याने साथीदारांसह त्यांचे अपहरण करून मारहाण केली होती.
सिद्धार्थ बनसोडे याच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल आहे. महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धार्थ बनसोडे 11 मे रोजी दुपारी घुसले होते. त्यानंतर दोघा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडी टॉमीसारख्या शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत देखील कैद झालं आहे. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत, हे कर्मचाऱ्यांनी न सांगितल्याच्या रागातून आमदारपुत्र आणि पीएसह दहा जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.
या दोन्ही प्रकरणातील आमदार बनसोडे यांच्या सात कार्यकर्त्यांना या प्रकरणात अटक झालेली आहे. मात्र सिद्धार्थ बनसोडे याल पोलिसानी अटक केली नव्हती. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश या प्रकरणात गप्प का असा सवालही विचारला जात होता. आज शेवटी रत्नागिरी येथून सिद्धार्थ बनसोडे याला अटक करण्यात आली.
NCP MLA Anna Bansode’s son finally arrested, case of two attempted murders
महत्त्वाच्या बातम्या
- सलमान खानचा केआरकेविरुद्ध मानहानीचा खटला, राधेच्या निगेटिव्ह रिव्ह्यूमुळे भडकला ‘सुलतान’
- पंतप्रधान मोदींचे वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनमध्ये बीजभाषण, जगभरातील बौद्ध संघ प्रमुखांशी व्हर्च्युअली संवाद
- 7 Years Of Modi Government : पीएम मोदींच्या ७ वर्षांच्या सत्तेतील देशात आमूलाग्र बदल करणारे ७ महत्त्वाचे निर्णय
- Coronavirus Cases in India : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा किंचित वाढ, २४ तासांत २.०८ लाख रुग्णांची नोंद, ४१५७ मृत्यू
- Whatsapp ने भारत सरकारविरुद्ध दाखल केला खटला, नव्या IT नियमांमुळे प्रायव्हसी संपण्याचा दावा