प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजपच्या सत्तेच्या वळचळणीला जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठिंब्याचे पत्र तयार होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केल्यानंतर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्याला दुजोरा दिला, पण वेगळ्या प्रकारे!!NCP Letter of Support After Shinde Rebellion Confirmation of Patel secret explosion Jayant Patil
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजपच्या सत्तेला पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे पत्र तयार होते. त्यावर 40 पेक्षा जास्त आमदारांनी सह्या केल्या होत्या. त्यात माझी देखील सही होती. पण जयंत पाटलांनी ते पत्र शरद पवारांपर्यंत पोहोचू दिले नाही, असा दुसरा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला. शरद पवारांना एकाकी कसे पाडायचे असे वाटून जयंत पाटील ढसढसा रडले, असा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला. पण याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर सत्तेच्या वळचणीला जायला तयार होती याचीच प्रत्यक्ष कबुली जितेंद्र आव्हाड यांनी दिली आणि त्याच वेळेत जयंत पाटलांनी त्यामध्ये कसा अडथळा आणला याचे वर्णन केले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी राष्ट्रवादीच्या 54 पैकी 51 आमदारांनी शरद पवारांना पत्र देऊन सरकारला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी कदाचित भाजपने एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी अजित पवारांना मुख्यमंत्री देखील केले असते, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत केला होता. या दाव्या पैकी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी कबूल केला. आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र तयार झाल्याचे आव्हाडांनी सांगितले. पण ते पत्र जयंत पाटलांनी शरद पवारांपर्यंत पोहोचूच दिले नाही, असाही खुलासा केला. याचा अर्थ जयंत पाटलांनीच एक प्रकारे राष्ट्रवादीच्या सत्तेत सत्तेवर जाण्यात अडथळा निर्माण केला असाच जितेंद्र आव्हाड यांनी गौकेस्फोट केला. मात्र शरद पवारांना एकाकी कसे सोडायचे असे म्हणून जयंत पाटील ढसाढसा रडले, अशी पुस्ती आपल्या वक्तव्याला आव्हाडांनी जोडली.
याचा सरळ अर्थ असा की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायला तयार होती. पण अजित पवार मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून जयंत पाटलांनी शरद पवारांना पर्यंत पत्र पोहोचू न देण्याची खबरदारी घेतली आणि ढसाढसा रडल्याचे दाखविले.
NCP Letter of Support After Shinde Rebellion Confirmation of Patel secret explosion Jayant Patil
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी फुटली; वसंतदादांच्या आत्म्याला चिरशांती मिळाली असेल; शालिनीताईंचा पवारांना टोला
- “केवळ महाराष्ट्रच नाही, तर उत्तर प्रदेशातही होऊ शकतो मोठा खेळ’’
- राष्ट्रवादीतल्या सिंडिकेट – इंडिकेट संघर्षात शरद पवारांना त्यांच्या गटाचे समर्थन जरूर, पण महाराष्ट्रात सहानुभूती का नाही??
- Land for Job Scam : तेजस्वी यादव यांच्या विरोधात CBI कडून आरोपपत्र दाखल!