विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात हिंदुत्वाची लाट उसळली असताना उतप्त झाले डाव्या आणि लिबरल पक्षाच्या नेत्यांनी हिंदूंसाठी स्फूर्तीस्थान आणि पूजनीय असलेल्या आयकॉन्स विरुद्ध गरळ ओकण्याची मोहीमच सुरू केली आहे. NCP, left liberals to targets hindu icons
महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नसल्याचा जावई शोध राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी आणि त्यांच्या समर्थक इतिहासकारांनी लावला असताना तिकडे केरळमध्ये आद्य शंकराचार्यांना जातिवादी प्रथेचे समर्थक ठरविण्याचा अश्लाघ्य उद्योग डाव्या पक्षाच्या मंत्र्यांनी केला आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. ते धर्मवीर नव्हते, असे वादग्रस्त वक्तव्य अजितदादांनी विधानसभेत केले. त्यावर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अमरावती, पुणे, नाशिक अशा विविध शहरांमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या प्रतिमा जाळल्या आहेत. पण त्या वर वरकडी करत जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा क्रूरकर्मा आणि हिंदू द्वेष्टा कधीच नव्हता, असा जावई शोध लावून हिंदुत्ववाद्यांच्या संतापात भर घातली आहे. संभाजी महाराजांचा वध मनुस्मृतीतील उल्लेखाप्रमाणे जाण्याचा ब्रिगेड इतिहास महाराष्ट्राच्या माथी मारण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
एकीकडे महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि त्यांचे समर्थक इतिहासकार छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर धर्मवीर नसल्याचे किटाळ उडवत असताना दुसरीकडे केरळमध्ये डाव्या पक्षाचे मंत्री एम. बी. राजेश यांनी आद्य शंकराचार्यांवरती किटाळ उडवले आहे. आद्य शंकराचार्य हे क्रूर जाती व्यवस्थेचे समर्थक होते.
ते नारायण गुरु यांच्यासारखे समतेचे पुरस्कर नव्हते, अशी गरळ एम. पी. राजेश यांनी ओकली आहे. केरळमध्ये वैचारिक वर्चस्व असले तरी हिंदुत्ववाद्यांनी राजेश यांना जोरदार विरोध सुरू केला आहे. आद्य शंकराचार्य आणि नारायण गुरू हे भारतीय परंपरेतील पूजनीय संतश्रेष्ठ होते. राजेश यांच्या परकीय परंपरेचा त्यांच्याशी संबंध नव्हता, अशी टीका परराष्ट्र राज्यमंत्री बी. मुरलीधर यांनी केली आहे.
NCP, left liberals to targets hindu icons
महत्वाच्या बातम्या
- छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान; राष्ट्रवादी – काँग्रेसचा राजकीय वर्तन व्यवहार, ठाकरेंच्या शिवसेनेसह आघाडीचा कडेलोट अपरिहार्य
- आमदार मुक्ताताई टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप; दोन भाजप आमदारांच्या कर्तव्यनिष्ठेचा वस्तूपाठ
- प्रियांका गांधींचे बिघडले बोल; सगळ्या नेत्यांना अदानी – अंबानींनी खरीदले, पण राहुलला खरीदू नाही शकले!!