NCP Leaders Jitendra Awhad : असदुद्दीन ओवैसी आणि दिग्विजय सिंह यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या डीएनएच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे, तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंबा दर्शविला आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी यामुळे समाजात शांतता येईल असं म्हटलं आहे. NCP Leaders Jitendra Awhad Praises RSS Chief Mohan Bhagawat DNA Comment On Hindu Muslim Unity
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : असदुद्दीन ओवैसी आणि दिग्विजय सिंह यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या डीएनएच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे, तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंबा दर्शविला आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी यामुळे समाजात शांतता येईल असं म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सरसंघचालकांच्या विधानाचे मी स्वागत करतो, त्यामुळे शांतता येईल. त्यांनी तेच म्हटले, जे 100 वर्षांहून अधिक काळापासून आपण बोलत आहोत. हा विचार स्वागतार्ह आहे.”
सरसंघचालक काय म्हणाले?
सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी म्हटले की, सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे आणि भारतात इस्लामला धोका आहे या भीतीच्या सावटाखाली मुस्लिमांनी राहू नये. ते म्हणाले की, जे मुस्लिमांना देश सोडून जाण्यास सांगतात ते स्वत: ला हिंदू म्हणू शकत नाहीत.
सरसंघचालक भागवत ‘हिंदुस्थानी प्रथम, हिंदुस्तान प्रथम’ या विषयावर गाझियाबाद येथे राष्ट्रीय मुस्लिम मंच आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले की, उपासना पद्धतीच्या आधारे लोकांमध्ये फरक करता येणार नाही. सरसंघचालकांनी लिंचिंगच्या घटनांमध्ये सामील झालेल्यांवरही हल्ला चढवला. ते म्हणाले की, “ते हिंदुत्वाच्या विरोधात आहेत.” तथापि, ते असेही म्हणाले की, लोकांवर लिंचिंगचे काही खोटे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
भागवत यांनी मुस्लिमांना म्हटले की, “इस्लामला भारतात धोका आहे, या भीतीच्या चक्रात त्यांनी पडू नये. ते म्हणाले की, देशात एकता झाल्याशिवाय विकास शक्य नाही. सरसंघचालकांनी जोर देत म्हटले की, एकतेचा आधार राष्ट्रवाद आहे. पूर्वजांचा अभिमान असावा. हिंदू-मुस्लिम संघर्षाचा एकमेव तोडगा म्हणजे ‘संवाद’ आहे, ‘विसंवाद’ नाही.
NCP Leaders Jitendra Awhad Praises RSS Chief Mohan Bhagawat DNA Comment On Hindu Muslim Unity
महत्त्वाच्या बातम्या
- प्रणबदांचे सुपुत्र अभिजीत काँग्रेस सोडून झाले तृणमूलवासी, बहीण शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या Sad!
- Modi Cabinet Expansion : मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा; सिंधिया, सोनोवाल, सुशील मोदींसहित 17 ते 22 नव्या मंत्र्यांची शक्यता
- Monsoon Session 2021 : फडणवीसांना सभागृहात बोलूच दिले नाही, भुजबळांना मात्र मुभा, यामुळे भाजप आमदार झाले आक्रमक
- Mansoon Session 2021 : विधानसभेत तुफान गदारोळ; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन, वाचा सविस्तर…
- स्टॅन स्वामींचे निधन, भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी वर्षभरापूर्वी झाली होती अटक