• Download App
    राष्ट्रवादीत भावी पंतप्रधान - भावी मुख्यमंत्री म्हणण्याची पद्धतच!!; फडणवीसांचा पवारांना टोलाNCP leaders always dreamt of further prime ministership - future chief ministership, quipped devendra Fadanavis

    राष्ट्रवादीत भावी पंतप्रधान – भावी मुख्यमंत्री म्हणण्याची पद्धतच!!; फडणवीसांचा पवारांना टोला

    प्रतिनिधी

    मुंबई : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्यामध्ये सुप्रिया सुळे यांची भर पडली आहे. जयंत पाटील, अजितदादा पवार यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे यांची पोस्टर्स भावी मुख्यमंत्री म्हणून लागली आहेत. NCP leaders always dreamt of further prime ministership – future chief ministership, quipped devendra Fadanavis

    या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना टोला हाणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या नेत्यांना भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री असे म्हणायची पद्धतच आहे. पण मी अनुभवातून शिकलो आहे, की कधीही काहीही होऊ शकते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असे कोणाला वाटले होते का?, पण ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे ज्यांना ज्यांना आपण भावी वाटतो आहोत, त्यांना माझ्या शुभेच्छा!!, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीतील मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धकांना टोला हाणला आहे.

    शरद पवार 1991 पासून पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांना कायम भावी पंतप्रधान असेच संबोधत आले आहेत. मराठी माध्यमे देखील पवारांच्या पंतप्रधान पदाच्या बातम्या उताविळीने देत असतात.

    या पार्श्वभूमीवर जेव्हा जयंत पाटील, अजितदादा पवार यांच्या भावी मुख्यमंत्री पदाची पोस्टर्स राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या मुख्यालयासमोर झळकली, त्यानंतर आज सुप्रिया सुळे यांचे पोस्टर देखील महाराष्ट्राच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री असे झळकले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी संतापही व्यक्त केला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या नेत्यांना भावी पंतप्रधान – भावी मुख्यमंत्री असे म्हणण्याची पद्धतच आहे, असे सांगून टोला हाणला आहे.

    NCP leaders always dreamt of further prime ministership – future chief ministership, quipped devendra Fadanavis

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस