• Download App
    रुपाली पाटील यांची फेसबुकवर बदनामी प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखलNCP leader Rupali patil -thombare defarmtion on social media,crime registered against MNS party workers in faraskhana police station

    रुपाली पाटील यांची फेसबुकवर बदनामी प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेल्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील -ठाेंबरे यांची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी अॅड.पुनम काशिनाथ गुंजाळ (वय-२७) यांनी पाेलीसांकडे मनसे कार्यकर्त्यां विराेधात तक्रार दिली आहे. त्यानुसार मनसेच्या १६ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर फरासखाना पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


    विशेष प्रतिनिधी

    पुणे :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेल्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील -ठाेंबरे यांची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी ॲड.पुनम काशिनाथ गुंजाळ (वय-२७) यांनी पाेलीसांकडे मनसे कार्यकर्त्यां विराेधात तक्रार दिली आहे. त्यानुसार मनसेच्या १६ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर फरासखाना पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  NCP leader Rupali patil -thombare defarmtion on social media,crime registered against MNS party workers in faraskhana police station

    मनसेचे कार्यकर्ते प्रसाद राणे, कुमार जाधव, राजेश दंडनाईक, गजानन पाटील, सावळया कुंभार, सागर चव्हाण, सचिन काेमकर, धृवराज ढकेडकर, सुधीर लाड, निजामुद्दीन शेख यांच्यासह आणखी सहा जणांवर याप्रकरणी भादंवि कलम ३५४ (अ)(ड),५००, ३४, आयटी ॲक्ट ६६, ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कार्यकर्त्यांनी फेसबुकवर एक कराेड ताईवर नाराज असणाऱ्यांचा ग्रुप तयार केला हाेता. त्यावरुन तक्रारदार ॲड.पुनम गुंजाळ यांना फ्रेंड रिक्वेस्ट आली हाेती. त्यांनी ही फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर त्यांना त्या ग्रुपच्या प्राेफाईलवर ॲड.रुपाली पाटील यांचा फाेटाे दिसला.

    विना परवानगी त्यांचा फाेटाे घेऊन त्याचा वापर करुन अश्लील भाषेत खिल्ली उडवली जात असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी एखाद्या महिले विषयी अश्लील भाषेत बाेलू नका अशी विनंती केल्यावर ही आराेपी सुधीर लाड याने व्यैक्तिक फेसबुक खात्यावरुन रुपाली ठाेंबरे यांना शिवीगाळ करत असल्याचा लाईव्ह व्हिडिओ टाकून बदनामी केली. याबाबत अधिक तपास फरासखाना पाेलीस करत आहे.

    NCP leader Rupali patil -thombare defarmtion on social media,crime registered against MNS party workers in faraskhana police station

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल