• Download App
    दिवसभराच्य़ा चौकशीनंतर एकनाथ खडसे ED कार्यालयातून सायंकाळी बाहेर NCP leader Eknath Khadse leaves ED office after being summoned in connection with a Pune land deal case.

    दिवसभराच्य़ा चौकशीनंतर एकनाथ खडसे ED कार्यालयातून सायंकाळी बाहेर

    वृत्तसंस्था

    मुंबई – भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची आज मुंबईच्या ED कार्यालयात चौकशी करण्यात आली. काही तास ही चौकशी चालू होती. सायंकाळी ते या कार्यालयातून बाहेर पडल्याची बातमी एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. NCP leader Eknath Khadse leaves ED office after being summoned in connection with a Pune land deal case.

    ED ने समन्स बजावल्यानंतर त्यांच्या कार्यालयात हजर होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना खड़से म्हणाले होते, की संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, काय चाललेय ते. ही चौकशी राजकारणातील सूडबुध्दीतून चालली आहे. आतापर्यंत ५ वेळा माझी चौकशी केली पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. एसीबीने आतापर्यंत माझ्या विरोधात एकही पुरावा दिलेला नाही. आता त्यांचा तसा रिपोर्टही आला आहे. आता ते पुन्हा चौकशी करणार आहेत.

    त्यानुसार आज दिवसभर ख़ड़से हे ED कार्यालयात होते. दिवसभर त्यांची अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यानंतर सायंकाळी खडसे तिथून बाहेर पडले.

    तत्पूर्वी, तुम्ही आमच्यामागे ED लावली तर आम्ही तुमची CD लावू, अशी धमकीवजा भाषा वापरणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या जावयाला ED अटक केल्यानंतर खडसे आज पत्रकार परिषद घेणार होते. पण त्याआधी त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद रद्द केली. पण तरीही ते आज ED कार्यालयात हजर राहिले. एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद रद्द झाल्याचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आले होते. खडसे यांची प्रकृती बिघडल्याने नियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात येत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते.

    ज्या भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधून राजीनामा द्यावा लागला होता, त्याच घोटाळ्याच्या प्रकरणात खडसेंच्या ED ने अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास आणि चौकशी पुढे गेल्यानंतर स्वतः खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांना देखील अटक होण्याची शक्यता आहे.

    या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार होते. पण तब्येत बिघडल्याने पत्रकार परिषदच रद्द करण्यात आली. त्यानंतर खडसे हे ED च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले. दिवसभर त्यांची चौकशी झाली.

    एकनाथ खडसे यांनी भाजपवर आगपाखड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांनी तुम्ही आमच्यामागे ED लावली तर आम्ही तुमची CD लावू, अशी धमकीवजा भाषा वापरली होती.

    पण त्या भाषेचा काही उपयोग झालाच नाही. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) त्यांना मोठा धक्का दिला. खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली त्यानंतर आज एकनाथ खडसेंची चौकशी केली.

    NCP leader Eknath Khadse leaves ED office after being summoned in connection with a Pune land deal case.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस