• Download App
    NCP leader criminal स्वारगेट पासून देवळ्यापर्यंत गुन्हेगारांचे कनेक्शन राष्ट्रवादी; पण फडणवीसांच्या गृह मंत्र्यालयाला पिंजऱ्यात ढकलण्याची घाई!!

    स्वारगेट पासून देवळ्यापर्यंत गुन्हेगारांचे कनेक्शन राष्ट्रवादी; पण फडणवीसांच्या गृह मंत्र्यालयाला पिंजऱ्यात ढकलण्याची घाई!!

    नाशिक : स्वारगेट पासून देवळ्यापर्यंत गुन्हेगारांचे कनेक्शन राष्ट्रवादीशी पण फडणवीस यांच्या गृहमंत्रालयाला आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलण्याची घाई!! हे विचित्र चित्र महाराष्ट्रात दिसून आले.

    स्वारगेट बलात्कारातला आरोपी आणि नाशिक जिल्ह्यातल्या देवळा शहरात कुंटणखाना चालवणारा आरोपी दोघांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध असल्याचे उघड्यावर आले. पण त्यावर मूग गिळून गप्प राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह मंत्रालयाला घेरले.

    स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोप दत्तात्रय गाडे याच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वारगेट बस स्थानकामध्ये जाऊन आंदोलन केले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकाच्या सुरक्षारक्षकांचे केबिन फोडले. या सगळ्या प्रकरणावरून पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात मोठा राजकीय असंतोष निर्माण झाला. हा संतोष निर्माण करण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर राहिली. खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्रालयावर ठळक प्रश्नचिन्ह उपस्थित करून महाराष्ट्रात महिला आणि मुली सुरक्षित आहेत का??, असा संतप्त सवाल केला.

    दरम्यानच्या काळात स्वारगेट बलात्कार प्रकरणांमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी १३ पथके नेमली त्याला शोधून देण्यासाठी एक लाखांचे इनाम जाहीर केले. त्याचा मागमूस काढण्यासाठी पथके वेगवेगळ्या ठिकाणी परवाना केली. परिवहन मंत्रालयाने स्वारगेट स्थानकातील 23 सुरक्षारक्षकांना निलंबित केले.

    हे सगळे घडत असताना दत्तात्रय गाडेचे इतर कुठल्या राजकीय पक्षाशी नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसशीच कनेक्शन असल्याचे उघड झाले. तो आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांचा कार्यकर्ता होता आणि आता तो अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माऊली कटके यांचा कार्यकर्ता असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांच्याही बॅनरवर दत्तात्रय गाडीचे फोटो आढळले इतकेच नाही तर दत्तात्रय गाडीच्या मोबाईल फोनवरच्या व्हाट्सअप डीपीवर आमदार माऊली कटके यांचा फोटो आढळला. दत्तात्रय हा माऊली कटके यांचाच कार्यकर्ता म्हणून शिरूर मध्ये वावरत असल्याचे अनेकांनी पोलिसांना सांगितले. पण तो हिस्ट्री शीटर गुन्हेगार आहे. शिरूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. पण याविषयी सुप्रिया सुळे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याने तोंड उघडले नाही. ते सगळे मूग गिळून गप्प बसले.

    एरवी सुप्रिया सुळे या सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाबद्दल बोलताना आपल्या आई-वडिलांच्या संस्कारांच्या नेहमी बाता मारत असतात, पण पवारांनी केलेले “राष्ट्रवादी संस्कार” बहुसंख्य वेळा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वेगळ्या कृतीतूनच उघड्यावर येतात. याची दोन उदाहरणे नुकतीच समोर आली. पवार संस्कारित राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याने आपल्या हॉटेलमध्ये कुंटणखाना चालवल्याचे समोर आले, तर दुसऱ्या पदाधिकाऱ्याने आईला मारहाण केल्याचे उघड्यावर आले.

    शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी सुनील आहेर उर्फ गोटू आबा याने नाशिक जिल्ह्यातल्या देवळामध्ये स्वतःच्याच हॉटेल वेलकम मध्ये कुंटणखाना चालवून तिथे बांगलादेशी महिलांना आणल्याचे उघड्यावर आले. पोलिसांनी बांगलादेशी महिलांना आणि हॉटेल वेलकमच्या मॅनेजरला ताब्यात घेतले पण गोटू आबा मात्र पळून गेला. हा गोटू आबा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा देवळा शहरातला चेहरा होता. त्याने देवळात बरीच सामाजिक काम उभे केल्याचे सांगितले जात होते. पण त्याचे हे “सामाजिक काम” कुंटणखाना चालवण्याचे होते, हे मात्र पोलीस तपासात उघडे झाले.

    दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी लोणावळ्यात आपल्याच आईला बेदम मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली. राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचा अध्यक्ष आणि कारल्याच्या एकविरा देवस्थानचा ट्रस्टी मारुती देशमुख यांनी आपल्या आईला मारहाण करून जखमी केले. दोन भावांच्या भांडणांमधून हे घडले. आई धाकट्या भावाकडे राहत होती ती त्याच्याकडून आपल्या घरी राहायला आली. हे मारुती देशमुखला आवडले नाही म्हणून त्याने आईला मारहाण केल्याचा आरोप कसा धाकटा भाऊ राजेंद्र देशमुख यांनी केला.

    पुण्यापासून देवळ्यापर्यंत आणि लोणावळ्यात या सगळ्या गुन्हेगारांचे राष्ट्रवादी काँग्रेस कनेक्शन समोर आले. पवारांनी आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते “कोणत्या संस्कारात” घडवले हे उघड्यावर आले. पण सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र त्याविषयी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारून राहिलेत. भाजपचे नेते मात्र नेहमीप्रमाणे यात पूर्णपणे गाफील दिसत आहेत.

    NCP leader criminal connection in most of the Maharashtra cases

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस