वृत्तसंस्था
मुंबई / कोल्हापूर : किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराविरोधात एल्गार पुकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध पायताण आंदोलन केले.कोल्हापूर रेल्वे स्थानकावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हातात पायताणे घेऊन किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.NCP lays foundation against Somaiya; Section 144 imposed by District Collector in Kolhapur; Sadabhabhau’s hint to respond to Dadagiri
यावर रयत क्रांती पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या दादागिरीला दादागिरीने उत्तर दिले जाईल. किरीट सोमय्या यांच्या केसाला जरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धक्का लावला तरी पुढच्या क्षणी महाराष्ट्रातले सरकार बरखास्त झालेले असेल, असा इशारा दिला आहे.
पोलिसांना झुकांडी देऊन किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये बसले. त्याचे लाईव्ह रिपोर्टिंग सर्व न्यूज चॅनेलने केल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकण्याची भीती निर्माण झाल्याने जिल्हाधिकार्यांनी कोल्हापुरात 144 कलम लावून जमाव बंदीचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्यात हसन मुश्रीफ समर्थकांनी किरीट सोमय्या विरोधात आंदोलनासाठी जोरदार तयारी केली आहे तर भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला जशास तसे उत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळेच कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्यांनी 144 कलम लावले आहे.
NCP lays foundation against Somaiya; Section 144 imposed by District Collector in Kolhapur; Sadabhabhau’s hint to respond to Dadagiri
महत्त्वाच्या बातम्या
- डोंबिवलीत पाण्यापाई तरुणीचा हात मोडला कल्याण-डोंबिवलीत २७ गावे तहानलेली
- दोन प्रौढ व्यक्तींना धर्माचा विचार न करता जोडीदार निवडण्याचा अधिकार, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्वाळा
- फौजदारी खटल्यांची चुकीची माहिती देणे महागात पडणार, सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका, अशा कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा हक्क नाही
- मोठी बातमी : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासोबतच काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊ शकतात कॅप्टन अमरिंदर; पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप