• Download App
    सेना-भाजपच्या वादात राष्ट्रवादीनेही घेतली उडी, नवाब मलिक म्हणतात - हा तर महाराष्ट्राचाच अपमान! । NCP jumped into the Sena-BJP dispute, Nawab Malik says this is an insult to Maharashtra

    सेना-भाजपच्या वादात राष्ट्रवादीनेही घेतली उडी, नवाब मलिक म्हणतात – हा तर महाराष्ट्राचाच अपमान!

    NCP jumped into the Sena-BJP dispute : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी सेना-भाजपमध्ये वाद पेटला आहे. आता या वादात राष्ट्रवादीनेही उडी घेतली आहे. भाजप नेते नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा करण्यात आलेला अपमान हा मुख्यमंत्र्यांचा नाही तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. तो कदापि सहन केला जाणार नाही, कोण कितीही मोठा असला तरी कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं. NCP jumped into the Sena-BJP dispute, Nawab Malik says this is an insult to Maharashtra


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी सेना-भाजपमध्ये वाद पेटला आहे. आता या वादात राष्ट्रवादीनेही उडी घेतली आहे. भाजप नेते नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा करण्यात आलेला अपमान हा मुख्यमंत्र्यांचा नाही तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. तो कदापि सहन केला जाणार नाही, कोण कितीही मोठा असला तरी कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं.

    राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांनी नारायण राणे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले, पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपकडून हिंसक राजकारण करण्यात आले. वातावरण बिघडवण्याचे काम करण्यात आले, त्याच पद्धतीने भाजप महाराष्ट्रात हिंसक वातावरण निर्माण करण्याचे काम करत आहे; परंतु महाराष्ट्रातील जनता हे स्वीकारणार नाही. राणे यांनी जी भाषा वापरली ती अशोभनीय आहे. ही भाषा व हे राजकारण महाराष्ट्र कधी स्वीकारत नाही, हे भाजपला कळले पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.

    मी जे काही बोललो तो गुन्हा नाही! – राणे

    दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे. तत्पूर्वी, नारायण राणे यांनी त्यांचे वकील अॅड. संजय चिठणील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राणे म्हणाले की, मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा, मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नायतर तुमच्याविरोधात माझी केस दाखल होईल. गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला?, असा सवाल राणे यांनी केला. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं मला माहीत नाही. तुम्ही म्हणताय म्हणून मी मान्य करणार नाही. तुम्ही माहिती घ्या, असं सांगतानाच मी जे काही बोललो तो क्रिमिनल ऑफेन्स नाही, असंही ते म्हणाले.

    नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

    रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, अशा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

    NCP jumped into the Sena-BJP dispute, Nawab Malik says this is an insult to Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    आव्हाड – पडळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे टीकास्त्र; कठोर कारवाईचे आदेश; पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर