नाशिक : सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचे नुसतेच धुमारे; पण बिहारमध्ये भाजपचे सत्तांतर बंगाल सत्तांतराच्या दिशेने!!, हे राजकीय वास्तव काल आणि आज समोर आले. sunetra Pawar
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्याला दोन महिने सुद्धा उलटून गेले नाहीत, तोच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्री पदाचे धुमारे फुटले. सुनील तटकरे, आदिती तटकरे यांच्यापासून ते संजय राऊत यांच्यापर्यंत सगळेच सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करायला “धावले.” सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून परफॉर्मन्स काय आणि कसा होतोय, याची वाट सुद्धा या नेत्यांनी पाहिली नाही. अजित पवार हयात असताना त्यांच्या समर्थकांनी कायम त्यांची छबी मुख्यमंत्री म्हणून नाचवली, पण अजित पवार कधी मुख्यमंत्री होण्यात यशस्वी झाले नाहीत. त्यांच्या अकाली एक्झिट नंतर त्यांचे समर्थक आता सुनेत्रा पवारांची छबी मुख्यमंत्री म्हणून नाचवायला लागलेत. पण या सगळ्यात मुख्यमंत्री पदाची हाव याखेरीज दुसरे काही नाही. राजकीय कर्तृत्व तर बिलकुल नाही.
– बिहारमध्ये “शांतपणे” सत्तांतर
त्या उलट भाजपने “शांतपणे” बिहारमध्ये सत्तांतर घडवून आणले. बिहारमध्ये आपल्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेऊन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग आज मोकळा झाला. भाजपने मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर करताना बिलकुल गाजावाजा केला नाही कुठल्या नेत्याच्या समर्थकांनी त्यांची पोस्टर्स झळकवून ढोल वाजवले नाहीत. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावांचे पतंग माध्यमांनी उडवले तरी भाजपच्या कुठल्याही नेत्याची स्वतःसाठी लॉबिंग करण्याची किंवा ते लॉबिंग माध्यमांमध्ये सांगायची हिंमत झाली नाही. भाजपने पक्षांतर्गत मुख्यमंत्रीपदाची चर्चा केल्याशिवाय निर्णय घेतला नाही पण उगाच त्या चर्चेला माध्यमी हवा सुद्धा दिली नाही. किंबहुना मोदी – शाहांच्या स्टाईलने भाजपने मुख्यमंत्री पदाचे नाव गुलदस्त्यातच ठेवले.
– बंगालमध्ये सत्तांतराची तयारी
बिहार पाठोपाठ अमित शाहांनी बंगालमध्ये बंगालीच मुख्यमंत्री होईल, असे जाहीर करून टाकले. बंगालचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा कार्यकर्ता, बंगाली भाषिक, बंगाली माध्यमामध्ये शिकलेला नेता असेल, असे अमित शाहांनी जाहीरपणे सांगितले. या वक्तव्यातून त्यांनी माध्यमांना कुठलीही बातमी दिली नाही किंवा आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कुठलीही “पॉलिटिकल हिंट” सुद्धा दिली नाही. त्यांनी फक्त पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होईल आणि ममता बॅनर्जी यांची सत्ता जाईल, एवढेच ठामपणे सांगितले.
– भाजपच्या नुसत्याच पत्रकार परिषदा नाहीत
पण त्या आधीपासून भाजपने बंगालमध्ये सत्तांतरासाठी आतून आणि बाहेरून दमदार पावले टाकली. मोठे संघटन उभे केले. त्या संघटनेत राजकीय जान फुंकली. नुसत्या पत्रकार परिषदा घेऊन आणि मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नेत्यांना उतरवून पोस्टरबाजी केली नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पश्चिम बंगाल मधल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भरपूर कामे आणि कष्ट करायला लावले, तेव्हा कुठे बंगालमध्ये सत्तांतराची पार्श्वभूमी तयार झाली. राष्ट्रवादी सारखी नुसती पोस्टरबाजी करून बंगाल मध्ये भाजपच्या सत्तांतराची पार्श्वभूमी तयार झाली नाही.
NCP in a hurry and eager to make sunetra Pawar chief minister
महत्वाच्या बातम्या
- Delimitation ला काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांचा विरोध, कारण की…
- Amarnath Yatra : अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून, 57 दिवस चालेल; 28 ऑगस्टला संपेल; 15 एप्रिलपासून नोंदणी
- एमपीएससीची भरती प्रक्रिया सुलभ करायचा फडणवीस सरकारचा निर्णय; संवर्गांची संख्या सुद्धा ५३ वरून १५३ वर!!
- Delhi EV Policy : दिल्लीत EV खरेदी केल्यास ₹1 लाखांपर्यंत सबसिडी; 2028 पासून पेट्रोल टू-व्हीलर विकल्या जाणार नाहीत