• Download App
    चिकटगावकरांना वगळून राष्ट्रवादीने केले बेरजेचे राजकारण; चिकटगावकरांनी राष्ट्रवादीतूनच केली वजाबाकी NCP did total politics by excluding the people of Chitgaon

    चिकटगावकरांना वगळून राष्ट्रवादीने केले बेरजेचे राजकारण; चिकटगावकरांनी राष्ट्रवादीतूनच केली वजाबाकी

    प्रतिनिधी

    संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांना बाजूला काढून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस नेत्यांचे पक्ष प्रवेश करून बेरजेचे राजकारण केले होते. पण चिकटगावकरांनी स्वतःच पक्षाबाहेर जाऊन राष्ट्रवादीत वजाबाकी करून टाकली आहे. NCP did total politics by excluding the people of Chitgaon

    भाऊसाहेब चिकटगावकर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे. मतदारसंघात दौरा करून त्यांनी जनतेची मते जाणून घेतली. चिकटगावकर यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे बारीक लक्ष होते. दौऱ्यातील सूर पोषक असल्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी तातडीने राजकीय समीकरणे जुळवत चिकटगावकरांना ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधून राष्ट्रवादीच्या वजाबाकीत शिवसेनेची बेरीज करून टाकली.
    भाऊसाहेब चिकटगांवकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चिकटगांवकरांच्या विरोधात जाऊन काँग्रेसच्या भाऊसाहेब ठोंबरे, पंकज ठोंबरे आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी प्रवेश दिला होता. ही बाब चिकटगांवकरांना खटकली होती. तेव्हापासून त्यांच्या मनात चलबिचल सुरु होती. काँग्रेस आमदार सतीश चव्हाण यांच्याशीही चिकटगावंकर यांचे वारंवार खटके उडत होते. अखेर चिकटगांवकरांनी ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. वैजापुरात हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात असून त्यांना वगळून राष्ट्रवादीने आधी केलेली बेरीज फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

    ठोंबरे काका पुतणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्याने भाऊसाहेब पाटील चिकाटगावकर हे नाराज होते. ठोंबरेंच्या प्रवेशानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सर्व पर्याय खुले असल्याचे संकेत दिले होते. तरी देखील पक्ष श्रेष्ठींनी चिकटगावकर यांच्या नाराजीवर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. नंतर चिकटगावकरांनी वैजापूर तालुक्यात दौरा केला होता. गावागावात जाऊन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत विचारणा केली होती. या दौऱ्यात अनेकांनी शिवसेनेत जाण्याचा विचार मांडला होता.

    चिकटगावकर यांच्या दौऱ्यातील सूर पोषक असल्याचे अंबादास दानवे यांना समजल्यावर त्यांनी तातडीने राजकीय समीकरणे जुळवत चिकटगावकरांना संपर्क साधला आणि आज ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधून मोहीम फत्ते केली. चिकटगावकर यांच्या रुपाने वैजापुरात एक मोठा नेता शिवसेनेला मिळाला असून येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा फायदा ठाकरे गटाला होण्याची शक्यता आहे.

     रमेश बोरनारेंना धक्का

    वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनी शिंदे गटात प्रवेश करून उद्धव ठाकरेंना धक्का दिला होता. शिंदे गटातल्या प्रवेशानंतर त्यांनी वैजापुरात मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. मात्र आता चिकटगावकरांच्या रुपात ठाकरेंना मोठा आधार मिळाला आहे. रमेश बोरनारे यांच्याविरोधात बळ एकवटण्यासाठी ठाकरेंच्या ताफ्यात आणखी एक सैनिक दाखल झाल्याने बोरनारे यांच्यासमोरील अडचणी वाढल्याची चर्चा वैजापुरात आहे

    NCP did total politics by excluding the people of Chitgaon

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा