राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना आगामी लाेकसभा निवडणुक लढण्यासाठी मावळ लाेकसभा मतदारसंघ शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी केली आहे. मात्र, मागील दाेन टर्मपासून मावळ लाेकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार श्रीरंग बारणे यावरुन आक्रमक झाले आहे. NCP Demanded Maval Constitution for Parth Pawar, But Shivsena clashesh for this demand
विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना आगामी लाेकसभा निवडणुक लढण्यासाठी मावळ लाेकसभा मतदारसंघ शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी केली आहे. मात्र, मागील दाेन टर्मपासून मावळ लाेकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार श्रीरंग बारणे यावरुन आक्रमक झाले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसाेबत दुजाभाव करत असून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारावर ताेफ डागली आहे.
खासदार बारणे म्हणाले, लाेकसभा निवडणुकीला दाेन वर्षापेक्षा अधिक काळ शिल्लक आहे. त्यामुळे ही मागणी काेणी केली का करण्यास लावली हे तपासून पहावे लागेल. मावळ लाेकसभा निवडणुकीत मागील वेळी मी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांचे विराेधात उभा हाेताे त्याचवेळी सांगितले की, दीड ते दाेन लाखांचे फरकाने मी विजयी हाेईल. मावळ लाेकसभा विधानसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघापैकी केवळ एक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असून उर्वरीत ठिकाणी त्यांची ताकद उरलेली नाही. त्यांची ताकद मर्यादित असताना जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला डिवचताे आहे का? हे पहावे लागेल.
महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष सत्तेत असताना, शिवसेनेच्या लाेकप्रतिनिधींना, पदाधिकाऱ्यांना कशाप्रकारे वागणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळते हे पाहिले तर सर्वाधिक सत्तेचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळताना दिसून येताे. महाविकास आघाडी सरकार मध्ये शिवसेनेला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. निवडणुकीला दाेन वर्ष असून याकाळात अनेक स्थित्यांतरे हाेऊन जातील. शिवसैनिकांचे मनात अनेक दिवस राेष असून महाविकास आघाडी म्हणायचे आणि दुसऱ्या पक्षाबद्दल आकस दाखवणे याेग्य नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ बांधणी
मागील लाेकसभा निवडणुकीत मावळ लाेकसभा मतदारसंघात माेठया फरकाने पार्थ पवार यांचा पराभव झाला हाेता.त्यानंतर वर्षभर पार्थ पवार मतदारसंघातून गायब झाले हाेते. मात्र,त्यानंतर हा पराभव जिव्हारी लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून मतदारसंघात कामास सुरुवात केली आहे.मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेत, सहकारी संस्थावर राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता आणण्याकरिता मागील काही दिवसांपासून प्रयत्न करण्यात येत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
NCP Demanded Maval Constitution for Parth Pawar, But Shivsena clashesh for this demand
महत्त्वाच्या बातम्या
- दलीतांची मते चालतात, पण बाबासाहेब नाहीत, पंडीत नेहरूंनी प्रचार करून डॉ. आंबेडकरांचा पराभव केला, रावसाहेब दानवे यांचा आरोप
- Sanjay Raut On ED Action : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे पाटणकरांवर ईडीची धडक कारवाई, संजय राऊत म्हणाले- देशात हुकूमशाहीची सुरुवात
- ED Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ईडीच्या कचाट्यातून आपले घर वाचवतील की ईडी – राष्ट्रवादीच्या कचाट्यातून शिवसेना नेत्यांना वाचवतील??