विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपने कितीही गदारोळ किंवा गोंधळ केला, तरी नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाहीच, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने धरला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीची बैठक आज सायंकाळी घेण्यात येत आहे. NCP came out in diffence of nawab malik and rohit pawar has written post on dictatorship
एकीकडे अशी नवाब मलिकांच्या बचावासाठी महाविकास आघाडी एकजूट तर दुसरीकडे आमदार रोहित पवार मात्र, केंद्र सरकारला उपदेशाचे डोस पाजणारी फेसबुक पोस्ट लिहिताहेत. अशी महाविकास आघाडीची आजची अवस्था आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर दाऊद मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीच्या कोठडीची हवा खात असलेल्या नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक रूप धारण केले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिकांच्या बचावासाठी एकवटली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक घेतली. त्यामध्ये नवाब मलिकांचा राजीनामा घ्यायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. विरोधकांनी म्हणजे भाजपने कितीही गोंधळ घातला, गदारोळ केला, तरी नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. आज सायंकाळी महाविकास आघाडीची बैठक बोलावल्याचे देखील त्यांनी सांगितले.
एकीकडे महाविकास आघाडीची एकजूट नवाब मलिकांच्या बचावासाठी होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र, भाष्य करणे टाळले आहे पण रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला उपदेश करणारी पोस्ट लिहिली आहे. देशात महागाई आणि बेरोजगारीचे संकट असताना देशाला संरक्षणावरचा जादा खर्च परवडणार नाही, असा उपदेश रोहित पवारांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर रशियातील एका व्यक्तीच्या अहंकारापायी सगळे जग युध्दाच्या खाईत लोटले गेल्याची टीकाही त्यांनी केली आहे. लोकशाहीची गळचेपी होत असताना आपण एकजूट दाखविली पाहिजे, असे उपदेशाचे डोस आणि टोमणे देखील रोहित पवारांनी मारले आहेत.
NCP came out in diffence of nawab malik and rohit pawar has written post on dictatorship
महत्त्वाच्या बातम्या
मिलिंद एकबोटे व साथीदारांवर गुन्हा दाखल; धाकटा शेखसल्ला दर्ग्यावरुन धार्मिक तेढ
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचे घोडे अर्थसंकल्पीय अधिवेशनात नहाणार का ?
महेश मांजरेकर यांना अभय; उच्च न्यायालयाकडून अटकेसारखी कारवाई न करण्याचे पोलिसांना निर्देश