• Download App
    NCP after Ajit Pawar's premature exit??, a test of Supriya Sule's leadership अजित पवारांच्या अकाली exit नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काय??, सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाची कसोटी!!

    अजित पवारांच्या अकाली exit नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काय??, सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाची कसोटी!!

    Ajit Pawar,

    बारामतीतल्या विमान अपघातात अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोकलहर पसरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोरकेपणाची भावना आली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि हजारो कार्यकर्त्यांना अश्रू आवरले नाहीत. सगळे शोक सागरात बुडाले.NCP after Ajit Pawar’s premature exit??, a test of Supriya Sule’s leadership

    पण अजित पवारांच्या अकाली exit नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न ठळकपणे सगळ्यांसमोर उभा राहिला. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आधाराने अजित पवारांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याबरोबर घेऊन भाजपच्या सत्तेची सोबत केली. परंतु, आता अजित पवारच आपल्यात राहिले नसल्याने संपूर्ण पक्षाचेच भवितव्य काय??, असा सवाल समोर आला. या निमित्ताने सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाची कसोटी लागण्याचा काळ समोर आला आहे.



    – दुसऱ्या फळीच्या नेतृत्वाची मर्यादा

    शरद पवारांचा राजकीय वारसा नेमका कोणी चालवायचा??, त्यासंदर्भात अंतिम निर्णय कोणी घ्यायचा या मुद्द्यावर तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद झाले होते. अजित पवार हे सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व मान्य करून पुढची वाटचाल करायला तयार नव्हते. त्यामुळे तर त्यांनी आपले स्वतःचे राजकीय भवितव्य शोधण्याच्या दृष्टीने भाजपच्या सत्तेची सोबत केली होती. परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घातलेल्या अटी आणि शर्तीनुसार त्यांना शरद पवारांची संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर घेऊनच भाजपच्या सत्तेची सोबत करावी लागली होती. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस वाटचाल करत होती. परंतु, ते स्वतः आणि खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे हे वगळून राज्यातली पक्षाच्या नेतृत्वाची दुसरी फळी तेवढ्या क्षमतेने तयार झालेली नव्हती. त्यामुळे मुळातच पक्षाच्या दुसऱ्या फळीत नेतृत्वाची मर्यादा तयार झाली. अजित पवारांच्या नंतर संपूर्ण पक्षच यापैकी कुणीही चालवेल आणि तो कार्यक्षमतेने पुढे चालेल, याची शक्यता फार दुरापास्त आहे

    – राजकीय फेरमांडणी अपरिहार्य

    अजित पवारांच्या अचानक झालेल्या exit नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने पुन्हा सगळीच राजकीय फेरमांडणी करणे अपरिहार्य बनले आहे. एक तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक करून सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली ही फेरमांडणी करावी लागेल, पण त्याचवेळी सुप्रिया सुळे यांना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राजकीय दृष्ट्या सामावून घ्यावे लागेल. या दोन्ही नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांचे “व्यवस्थापन” करावे लागेल. त्यामध्ये सुप्रिया सुळे यशस्वी झाल्या तर काही अंशी त्यापुढे जाऊ शकतील.

    – सुप्रिया सुळे यांना कार्यक्षमतेने उभे राहावे लागेल

    काहीही झाले तरी शरद पवारांचे वय आता संपूर्ण पक्ष पुन्हा जुन्या कार्यक्षमतेने उभा करण्याचे नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी एक तर सुप्रिया सुळे यांना पूर्ण क्षमतेने पेलावी लागेल. अन्यथा त्या पक्षातल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्वतःचे स्वतंत्र राजकीय भवितव्य शोधावे लागेल. त्यासाठी कदाचित थेट भाजपचा मार्ग चोखाळावा लागेल, अशी शक्यता आहे. त्यासाठी त्यांना थेट नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या ज्या काही थोड्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तात्विक राजकारण करायचे असेल, त्यांना एक तर काँग्रेसचा मार्ग मोकळा असेल किंवा स्वतःचा स्वतंत्र मार्ग स्वीकारावा लागेल.

    या सर्व परिस्थितीत सुप्रिया सुळे स्वतंत्रपणे पक्षाची जबाबदारी पेलण्यासाठी उभ्या राहतील का??, तेवढी त्यांची क्षमता आहे का??, संपूर्ण पक्ष पुढे नेऊन आपल्या नेत्यांना त्या कार्यक्षमतेने नेतृत्व देऊ शकतील का??, हे गंभीर सवाल या निमित्ताने अचानक समोर आले आहेत. आगामी काळ त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी पाहणार आहे.

    NCP after Ajit Pawar’s premature exit??, a test of Supriya Sule’s leadership

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अजित पवारांचा आज दिवसभर कार्यक्रम काय होता??; बारामती तालुक्यात ते कुठे कुठे घेणार होते सभा??

    Ajit Pawar exit : एक दमदार आणि दिलदार मित्र गमावला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भावना!!

    Ajit Pawar exit : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे सोडून सुनेत्रा पवारांचे नेतृत्व विकसित होईल??