• Download App
    दोन लाख रुपयांचे बक्षिस असलेल्या नक्षलवाद्याला अटक, गडचिरोली पोलिस दलाची कौतुकास्पद कामगिरी | Naxalite has been arrested, commendable performance of Gadchiroli police

    दोन लाख रुपयांचे बक्षिस असलेल्या नक्षलवाद्याला अटक, गडचिरोली पोलिस दलाची कौतुकास्पद कामगिरी

    विशेष प्रतिनिधी

    गडचिरोली : पेरमिली हद्दीत नक्षलविरोधी अभियान राबवताना जहाल नक्षलवादी मंगरू कटकू मडावी याला अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश मिळाले आहे. पोलिस उपविभाग अहेरी अंतर्गत येणार्या उपपोस्ट पेरिमिली हद्दीत मिळालेल्या सूत्रांच्या विश्वसनीय माहितीच्या आधारे पेरमिली जंगल परिसरात पोलिसांनी हे विशेष अभियान राबवले होते. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यावर यापूर्वी निष्पाप नागरिकांची हत्या तसेच पोस्टवर केलेला हल्ला असे हिंसक गुन्हे नोंद आहेत.

    Naxalite has been arrested, commendable performance of Gadchiroli police

    पकडण्यात आलेल्या नक्षलवादी मौजा वीसामुंडी पोरके नारगुंडा तालुका भारमानगड येथील रहिवासी होता. हा पेरिमिली एलओसी मध्ये एलओसीच्या सदस्यपदावर भरती होऊन एक्शन टीम मेंबर म्हणून काम करत होता. तसेच तो प्रतिबंधित असलेल्या दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटनेच्या वरिष्ठ कॅडर देखील होता.


    ओडिशातील घनदाट जंगलातील नक्षलवादी म्होरक्यांचा अड्डा सुरक्षा दलाकडून उद्‌ध्वस्त


    काही दिवसांपूर्वीच झालेल्या पोमके बुर्गी हद्दीतील उपसरपंच रामा तलांडी यांच्या खुनामध्ये तसेच पौमे बुर्गी पोस्टवर केलेल्या हल्ल्यामध्ये तो मुख्य संशयित आरोपी होता. त्याच्यावर तीन खून आणि एक चकमक असे एकूण चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या नक्षली कारवायावरील  प्रचारास आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. याव्यतरिक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहेत.

    अधीक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी नक्षलवादविरोधी अभियान तीव्र केले असून, नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करावे असे त्यांनी आव्हानदेखील केले आहे.

    Naxalite has been arrested, commendable performance of Gadchiroli police

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : 2047 पर्यंत देशातील अणुऊर्जा उत्पादन 100 गिगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर

    फडणवीस केंद्राची 50 टक्के भागीदारी मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर मेट्रो विस्तार शक्य

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे