• Download App
    नवाब मलिकांचा ईडी न्यायालयीन कोठडीचा मुक्काम १४ दिवसांनी वाढला!! Nawab Malik's stay in ED court cell extended by 14 days

    Nawab Malik ED : नवाब मलिकांचा ईडी न्यायालयीन कोठडीचा मुक्काम १४ दिवसांनी वाढला!!

    प्रतिनिधी

    मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लँडिंग करणारे राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा मुक्काम १८ एप्रिल पर्यंत वाढलेला आहे. Nawab Malik’s stay in ED court cell extended by 14 days

    नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दाऊद गँगशी संबंधित व्यक्तीकडे जमीन खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मलिक यांची कोठडी संपल्याने त्यांना विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले. यावेळी दोन्ही बाजूंनी युक्तीवाद केल्यानंतर कोर्टाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.



    दाऊदच्या बहिणी समवेत मनी लॉन्ड्रिंग

    नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर हिच्यासमवेत मनी लॉन्ड्रिंग करून गोवावाला कंपाऊंडमधील तीन एकर जमीन बळकावली होती. त्यामुळे मलिक यांच्या घरावर ईडीने छापे घातले होते. त्यानंतर त्यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करण्यात आली असता त्यांना 7 मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती. आता 18 एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

    याआधी कोर्टाने मलिक यांना तुरुंगात खुर्ची, बेड आणि अंथरुण देण्यास परवानगी दिली आहे. या आधी प्रकृती बिघडल्याने मलिक यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.

    Nawab Malik’s stay in ED court cell extended by 14 days

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !