वृत्तसंस्था
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी करण्यात आली आहे. मात्र नवाब मलिकांना अद्याप दिलासा मिळालेला नाही त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. Nawab Malik’s stay in custody extended; Extension of judicial custody by 14 days
कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. नवाब मलिक यांच्यावर न्यायालयाच्या परवानगीने कुर्ल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉंड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारीला ईडीने अटक केली होती. तेव्हापासून ते कोठडीत आहेत.
100 कोटींच्या खंडणी प्रकरणात वेगवेगळ्या कोठड्यांमध्ये राहून माझे गृहमंत्री अनिल देशमुख जामिनावर बाहेर आले. पण नवाब मलिकांची मात्र सुटका झालेली नाही.
Nawab Malik’s stay in custody extended; Extension of judicial custody by 14 days
महत्वाच्या बातम्या