• Download App
    नवाब मलिकांचे खळबळजनक विधान , म्हणाले - हिवाळी अधिवेशनात अनेक नेत्यांची नावे जाहीर करणारNawab Malik's sensational statement, said - will announce the names of several leaders in the winter session

    नवाब मलिकांचे खळबळजनक विधान , म्हणाले – हिवाळी अधिवेशनात अनेक नेत्यांची नावे जाहीर करणार

    मलिक म्हणले की , अधिवेशनात माझं नाव घेऊन हल्ले होतील. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होणार आहे.Nawab Malik’s sensational statement, said – will announce the names of several leaders in the winter session


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नवाब मलिक यांनी परिषद घेऊन एक खळबळजनक दावा केला आहे.यात मलिक म्हणले की, भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड हे कालपासून समीर वानखेडेंना भेटत आहेत. मी येत्या हिवाळी अधिवेशनात या नेत्यांची नावे जाहीर करणार आहे. त्यावेळी या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणं मुश्किल होईल. त्यामुळे हे नेते कोण? याबद्दल सर्वांना प्रश्न पडला आहे.

    पत्रकार परिषदेत मलिक म्हणले की , काशिफ खानला अटक झाल्यावर अनेकांची पोलखोल होणार आहे. त्याच्याकडे किती लोकांचे पैसे आहे. हे उघड होईल, असं सांगतानाच येणारं विधानसभेचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. विधानसभेत मी जे काही समोर आणणार या राज्यात ते नेते तोंड दाखवू शकणार नाही, असा दावा मलिक यांनी केला आहे.



    पुढे मलिक म्हणले की , अधिवेशनात माझं नाव घेऊन हल्ले होतील. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होणार आहे. मी विषय डायव्हर्ट करावा म्हणून प्रयत्न होईल. पण मी कुणाचं नाव घेऊन मी विषय डायव्हर्ट करणार नाही. पण हिवाळी अधिवेशनात मी मोठमोठे नावे जाहीर करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

    पार्टीतील १३०० लोकांचा तपास का झाला नाही?

    ड्रग्ज पार्टीतील दाढीवाला सेक्स रॅकेट, पोर्नोग्राफी, ड्रग्ज रॅकेट चालवतो. त्याला अटक का केली नाही? ज्याने पार्टी आयोजित केली होती. त्याला कसं सोडून दिलं जाऊ शकतं? पार्टीचा आयोजकची पार्श्वभूमीच ड्रग्ज रॅकेटची असताना त्या अँगलने तपास का केला नाही? असा सवाल करतानाच पार्टीतील 1300 लोकांचा तपास का झाला नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.

    होय मी भंगारवाला , माझे वडील भंगारवाले

    मी काही लोकांच खर रूप मी सगळ्यांसमोर आणल आहे. त्यामुळे सगळे माझ्या विरोधात चालले आहेत .माझे वडील भंगारवाला होते म्हणून मला डिवचले जात आहे. होय, माझे वडील भंगारवाला होते. मी भंगारवाला आहे. पण मी कुठलीही बँक बुडवली नाही. कुठेही सोन्याची तस्करी केली नाही. कुणालाही फसवले नाही. माझ्या घरी कधीही सीबीआयची रेड पडली नाही, असा टोला नवाब मलिक यांनी विरोधकांना लगावला आहे.

    Nawab Malik’s sensational statement, said – will announce the names of several leaders in the winter session

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस