वृत्तसंस्था
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. आणि पुन्हा एकदा नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ झाली आहे. तसेच मलिकांच्या वैद्यकीय चाचणीसाठी न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. Nawab Malik’s custody extended again by 14 days
माहितीनुसार, नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून कुर्ल्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे मलिकांवर नक्की काय उपचार सुरू आहे? याची माहिती घेण्याकरीता तपास यंत्रणेच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तो अर्ज न्यायालयाने स्वीकारला आहे. मलिकांची जेजे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात यावी, इतके महिने त्यांच्यावर काय उपचार सुरू आहेत? आणखीन कोणत्या उपचारांची त्यांना गरज आहे? अशा आशयाचा अहवाल २ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे तज्ज्ञ पथकाला निर्देश दिले आहेत.
तर दुसऱ्या बाजूला नवाब मलिकांची एक किडनी निकामी झाली असून त्यांना किडनी प्रत्यारोपणच्या पुढच्या उपचारासाठी जामीन देण्याचा अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता नवाब मलिकांनी न्यायालयाच्या या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. लवकरच यासंदर्भातील उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. गुरुवारी, १९ जानेवारीला मलिकांची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी संपत असल्याने आणखीन १४ दिवसांची नियमित वाढ मुंबई सत्र न्यायालयाकडून करण्यात आली आहे.
नवाब मलिकांचे नेमके प्रकरण काय?
महाविकास आघाडीचे सरकार असताना नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असल्याचा खुलासा झाला होता. हसीन पारकरकडून कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदी कवडीमोल भावात केल्याचा आरोप मलिकांवर ई़डीकडून करण्यात आला होता. या व्यवहारात मलिकांनी आर्थिक गैरव्यवहार केला होता. तसेच मलिकांकडून हसीन पारकरने स्वीकारलेले पैसे टेरर फंडिंगसाठी दाऊदने वापरल्याचे, ईडीने सांगितले होते. त्यामुळे याप्रकरणी २३ फेब्रुवारी २०२२ नवाब मलिकांना अटक केली होती.
Nawab Malik’s custody extended again by 14 days
महत्वाच्या बातम्या