वृत्तसंस्था
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्यासमवेत जमीन खरेदी गैरव्यवहारात मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असलेले राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना आज मुंबईतल्या जे. जे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. Nawab Malik today J. J. Discharge from hospital; ED in the cell again !!
- Nawab Malik ED : नवाब मलिकांचे चौकशीत ईडीला असहकार्य; मुलगा फराज ईडीच्या रडारवर!!; या आठवड्यात चौकशी
नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने अटक केल्यानंतर त्यांना पीएएमएल कोर्टाने कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु त्यांना ईडीच्या कोठडीत पोटदुखी सुरु झाली. त्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती बरी आहे, अशी माहिती नवाब मलिक यांची मुलगी निलोफर खान यांनी दिली आहे.
त्यानंतर आज नवाब मलिक यांना जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. नवाब मलिक यांची ईडीची कोठडीची मुदत 3 मार्च पर्यंत आहे. त्यामुळे मलिक यांची जे. जे. हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रवानगी ईडीच्या कोठडीत होणार आहे.
Nawab Malik today J. J. Discharge from hospital; ED in the cell again !!
महत्त्वाच्या बातम्या
- दररोज तीन हजार अफगाणी लोक इराणला कामासाठी जातात : बेरोजगारीचा परिणाम
- वीज वापरल्याने थकीत बिले भरावीच लागतील; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा इशारा
- शिवप्रेमी महाराष्ट्राच्या भावना दुखावणारे वक्तव्य राज्यपालांनी मागे घ्यावे – उदयनराजे भोसले
- मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात हाच माझा शुद्ध हेतू – छत्रपती संभाजी राजे