प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जातीवाद वाढला वाढला अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. त्याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी चिडून प्रत्युत्तर दिले आहे. जातीवाद आमच्यामुळे वाढला नाही, तर जातीयवादी पक्षांमुळेच तो वाढला, असे प्रत्युत्तर नबाब मलिक यांनी दिले.Nawab Malik targets Raj Thackeray over his remarks on NCP Maratha politics
राज ठाकरे यांनी एबीपी माझाच्या व्हिजन महाराष्ट्र कार्यक्रमात महाराष्ट्रातील जातीवादा बद्दल परखड भाष्य केले होते. जेम्स लेन प्रकरणावरून मराठा तरुणांची माथी भडकवण्याचे आली होती. हे सगळे ठरवून करण्यात आले होते. 80 – 90 च्या दशकात देशात मुस्लिमधार्जिणे वातावरण तयार होत असताना बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा आवाज बुलंद केला.
त्यामुळे तो लोकांना आपलासा वाटला. हिंदुत्ववादी राजकारण जसे पुढे आले, तसे हिंदुत्वात फूट पाडण्यासाठी जातीवादी राजकारणाची सुरुवात करण्यात आली. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्याला बळ मिळाले. मराठा तरुणांची माथी जेम्स लेन प्रकरणावरून भडकवण्यात आली. एका जातीविरुद्ध दुसरी जात अशी मांडणी करून विविध जातींमधल्या तरुणांना भडकवण्यात आले, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.
त्याला नबाब मलिक यांनी आज प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले – शाहू – आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आमच्याकडे जातीवाद नाही. जातीयवादी पक्षांमुळेच जातीवाद भडकला आहे. त्या पक्षांनीच आत्मपरीक्षण करावे, असा खोचक सल्ला नवाब मलिक यांनी राज ठाकरे यांना दिला.
Nawab Malik targets Raj Thackeray over his remarks on NCP Maratha politics
महत्त्वाच्या बातम्या
- राहुल गांधी यांच्यासह गोंधळी खासदारांना वर्षभरासाठी निलंबित करा; रामदास आठवले
- अर्थव्यवस्थेत सुधारणांचे संकेत : किरकोळ महागाई जुलैमध्ये ५.५९%, तीन महिन्यांतील सर्वात कमी; औद्योगिक उत्पादनही वाढले
- छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासाचे शिखर पुरूष; शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या शताब्दी गौरव समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भावोद्गार
- Share Market : 55 हजारी झाले सेन्सेक्स, अर्थव्यवस्था मजबुतीच्या संकेतांमुळे गुंतवणूकदारांत उत्साह