ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंविरोधात आरोपांची राळ उडवून त्यांना अक्षरश: घायाळ करुन सोडलंय. मी केलेले सगळे आरोप जर खोटे असतील तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, अशी रोखठोक भूमिका नवाब मलिक यांनी जाहीर केली आहे. NAWAB MALIK:… So I will leave politics – I will leave the ministry; Public role of Nawab Malik in Sameer Wankhede case
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे-पवार सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंविरोधात अनेक आरोप केले आहेत. मी केलेले सगळे आरोप जर खोटे असतील तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, अशी भूमिका नवाब मलिक यांनी घेतली आहे.
वानखेडे यांचा जन्मदाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन
आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे बडे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक वानखेडेंविरोधात अनेक दावे ते करत आहेत. मलिकांच्या आरोपांना काल समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. तसंच आम्ही हिंदूच आहोत हे देखील तिने ठासून सांगितलं. पण मलिक त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.
माझे आरोप खोटे ठरवून दाखवा, मलिकांचं वानखेडे कुटुंबियांना आव्हान
मी आतापर्यंत समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांवर ठाम आहे. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा ठरल्यास मंत्रिपद सोडायला तयार आहे. मी केलेले आरोप खोटे ठरवून दाखवा, असं आव्हानच मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांना दिले आहे.
NAWAB MALIK:… So I will leave politics – I will leave the ministry; Public role of Nawab Malik in Sameer Wankhede case
महत्त्वाच्या बातम्या
- दिवाळीच्या तोंडावर २० रेल्वे गाड्या रद्द; अमरावतीत बडनेरा रेल्वे डेपोच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने निर्णय
- पेट्रोल-डिझेल कंपन्यांना दर ठरविण्याचा अधिकार काँग्रेस राजवटीत दिला; वारंवार इंधनाची दरवाढ
- भारतीय वंशाच्या अनिता आनंद बनल्या कॅनडाच्या नवीन संरक्षण मंत्री , पंतप्रधान ट्रुडो यांनी केली नवीन मंत्रिमंडळाची घोषणा
- AGAIN INDIA VS PAK : भारत-पाक सामन्यातील विक्रमांचा पाकला विसर ! हरभजनची धडाकेबाज ‘बोलिंग’ आणि मोहम्मद आमिर गपगार ! फिक्सर को सिक्सर-दोघांमध्ये तुफान ट्विटर वॉर….