वृत्तसंस्था
पुणे : “नवाब मलिकांनी बहुतेक मंत्रीमंडळामधून राजीनामा दिलाय. तुम्ही जर मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री आहात तर तुम्ही प्रेसच्या माध्यमातून एसआयटीची का मागणी करताय ?,” असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मलिक यांना लगावला. “Nawab Malik resigns from cabinet”; Chandrakat Patil on SIT
“संपूर्ण सरकार तुमच्या हातात आहे. एक गृहमंत्री (अनिल देशमुख) जरी जेलमध्ये गेले. दुसरे गृहमंत्री (दिलीप वळसे-पाटील) आजारी होते ते काल बरे झालेत. तुमच्याकडे सगळी सत्ता आहे. एसआयटी नेमा नाहीतर डबल एसआयटी नेमा. रोज सकाळी उठून ट्विट करा, प्रेस घ्या; म्हणजे मंत्रीमंडळातून तुम्हाला काढलेलं दिसतंय. मंत्रीमंडळातून काढलेल्या माणसानेच मागणी करायची असते,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
समीर वानखेडे यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आल्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. त्यावर ते बोलत होते.
आर्यन खान प्रकरणामधील तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आल्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी सकाळी पुन्हा एकदा ट्विटरवरुन या प्रकरणी भाष्य केलंय.
शुक्रवारी संध्याकाळी उशिरा आर्यन खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडे सोपवल्यानंतर आज सकाळीच मलिक यांनी ट्विट करुन, समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी केलीय. मात्र मलिक यांच्या या ट्विटवरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यामध्ये बोलताना मलिक यांना मंत्री मंडळातून काढून टाकल्याचा खोचक टोला लगावला आहे. मंत्र्यानेच एसआयटीची मागणी करणं हे थोडं विचित्र असल्याचं मत पाटील यांनी व्यक्त केलंय.
“Nawab Malik resigns from cabinet”; Chandrakat Patil on SIT
महत्त्वाच्या बातम्या
- गडबड चीज पीएंगे तो ऐसाही होगा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दारूबंदी निर्णयावर ठाम
- खलिस्तानवाद्यांचा आता थेट कॅनडात जाऊन शोध, शेतकरी आंदोलनात सहभागाचा संशय
- केंद्राने केले आता तुम्हीही करा, इंधनावरील १२ रुपये नफा कमी करून सवलत द्या, नवनीत राणा यांची मागणी
- शरद पवार कधीपासून सरकारची भूमिका मांडायला लागले? चद्रकांत पाटील यांचा सवाल
- मुकेश अंबानी भारतातच राहणार, लंडनला स्थाईक होणार असल्याच्या अफवाच