विशेष प्रतिनिधी
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. दरम्यान, नवाब मलिकांना कोर्टात हजर केले गेले. सकाळीच अधिकारी माझ्या घरी दाखल झाले. मला जबरदस्तीने ‘ईडी’ कार्यालयात आणले. तिथे गेल्यावर समन्सवर सही घेतली. कोणत्या अधिकाराखाली ही कारवाई करत आहेत, याची माहितीही दिली नाही,असे मलिकांनी कोर्टात सांगितले. Nawab Malik produced in front of court
‘ईडी’ने सकाळी 7 वाजता त्यांच्या घरावर छापा टाकला होता. सुमारे तासाभरानंतर त्यांना सोबत घेतले. तेव्हापासून नवाब मलिक ‘ईडी’ कार्यालयात हजर आहेत. सुमारे सहा तास चाललेल्या चौकशीनंतर ही कारवाई झाली.
अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (Enforcement Directorate)’ईडी’ ने बुधवारी ही मोठी कारवाई केली.
‘ईडी’ची ही कारवाई अंडरवर्ल्डशी संबंधित एका प्रॉपर्टी प्रकरणात झाली आहे. यामध्ये दाऊद इब्राहिमचेही नाव समोर येत आहे. ‘ईडी’ने इक्बाल कासकरशी संबंधित कथित जमीन व्यवहाराची चौकशी सुरू केली आहे.
Nawab Malik produced in front of court
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांवर ईडी कारवाईचा थेट यूपी निवडणुकीशी संबंध, आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला संशय
- Nawab malik ED : राष्ट्रवादीचे मोर्चे ईडी विरोधात? की चौकशीत “कोणाचे” नाव घेऊ नये म्हणून नवाब मलिकांवर दबावासाठी…??
- भुजबळ, देशमुखांच्या अटकेच्या वेळी मोर्चे नाहीत, फक्त नवाब मलिकांच्या ईडी चौकशीच्या वेळी राष्ट्रवादीचे मोर्चे!!; रहस्य काय??
- औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील परिचारिकांचे विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन
- कोरोना ज्या वूहानच्या लँबोरेटरीमधून निघाला त्याचा मालक बिल गेट्स : मेधा पाटकर यांचा घणाघात