• Download App
    NAWAB MALIK PRESS : नवाब मलिक कोणता गौप्यस्फोट करणार?मोठी स्क्रीन-कुर्ल्यात जय्यत तयारी ; आज घेणार पत्रकार परिषद । NAWAB MALIK PRESS: What secret blast will Nawab Malik carry out? Press conference to be held today

    NAWAB MALIK PRESS : नवाब मलिक कोणता गौप्यस्फोट करणार?मोठी स्क्रीन-कुर्ल्यात जय्यत तयारी ; आज घेणार पत्रकार परिषद

    आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आज आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा सुरू आहे. NAWAB MALIK PRESS: What secret blast will Nawab Malik carry out? Press conference to be held today


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत आर्यन खान प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित सुनील पाटील याचा संबंध असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला. त्यानंतर आता आज सकाळी नवाब मलिक पत्रकार परिषदेत कोणता गौप्यस्फोट करणार आहेत, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.दरम्यान या पत्रकार परिषदेसाठी कुर्ल्यात जय्यत तयारी करण्यात आली असून मोठी स्क्रीन देखील लावण्यात आली आहे. त्यामुळे आज मलिक कोणता बॉम्ब फोडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    काही दिवसांपूर्वीच नवाब मलिक यांनी रविवारच्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती उघड करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनीही मलिक यांच्याविरोधात आरोप सुरू केले. भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले. त्यावर मलिक यांनी मोहित कंबोज हे समीर वानखेडे यांच्या आर्मीचा सदस्य असून पत्रकार परिषदेत खोटे आरोप केले आहेत. मी या प्रकरणी सत्य सर्वांसमोर आणणार असल्याचे मलिक यांनी कंबोजच्या पत्रकार परिषदेनंतर म्हटले.

    NAWAB MALIK PRESS : What secret blast will Nawab Malik carry out? Press conference to be held today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!